महाराष्ट्र शासनाच्या स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाडमय पुरस्कार स्पर्धेसाठी प्रवेशिका आमंत्रित

भंडारा :- मराठी भाषेतील उत्कृष्ट वाडमय निर्मितीसाठी प्रकाशन वर्ष 2023 करिता शासनाच्यातवीने देण्यात येणाऱ्या स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाडमय पुरस्कारांसाठीच्या प्रवेशिका जिल्हाधिकारी कार्यालयात मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात दिनांक 1 जानेवारी,2024 ते 31 जानेवारी,2024 पर्यत पाठविता येणार आहेत.

तसेच 1 जानेवारी,2023 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत प्रकाशित झालेली प्रथम आवृती पुस्तके या स्पर्धेसाठी पात्र आहेत.या स्पर्धेची नियमावली व प्रवेशिका सचिव,महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाटयमंदिर इमारत,दुसरा मजला,सयानी मार्ग, प्रभादेवी मुंबई 400025 यांच्या कार्यालयात तसेच मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळता अन्यंत्र संबधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात सर्वसाधारण शाखा अथवा करमणूक शाखा विनामुल्य उपलब्ध होतील.

महाराष्ट्र शासनाच्या www.maharastra. gov. in या संकेतस्थळावर नवीन संदेश या सदरात स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाडमय पुरस्कार 2023 नियमावली व प्रवेशिका या शीर्षाखाली व What s new या सदरात Late Yashwantrao Chavan State Literature Award 2023 Rules Book and Application Form या शीर्षखाली व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या http://sahitya.marathi.gov.in या सदरात स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाडमय पुरस्कार 2023 नियमावली व प्रवेशिका या शीर्षाखाली व What s new या Late Yashwantrao Chavan State Literature Award 2023 Rules Book and Application Form या शीर्षाखाली व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या http://sahitya.marathi.gov.in या संकेतस्थळावर प्रवेशिका व नियमपुस्तिका उपलब्ध होतील.

तसेच प्रवेशिका पूर्णत भरुन आवश्यक साहित्याह सचिव महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या http://sahitya.marathi.gov.in या संकेतस्थळावर प्रवेशिका व नियमपुस्तिका उपलब्ध होतील.प्रवेशिका पूर्णत : भरुन आवश्यक साहित्यासह सचिव महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात 1 जानेवारी,2024 ते 31 जानेवारी,2024 या विहित कालावधीत पोहचतील अशा बेताने पाठवाव्यात लेखक प्रकाशक या स्पर्धेसाठी प्रवेशिक दाखल करुन शकतात.

मुंबई शहर व मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यातील लेखक प्रकाशकांनी पुस्तकांच्या दोन प्रतीसह विहित नमुन्यातील प्रवेशिका सचिव,महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,रवींद्र नाटयमंदिर इमारत,दुसरा मजला,सयानी मार्ग,प्रभादेवी,मुंबई 400025 येथे पाठवाव्यात मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून अन्य ठिकाणच्या लेखक प्रकाशकांनी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हे साहित्य 1 जानेवारी,2024 ते 31 जानेवारी,2024 या विहित कालावधीत पाठवावे,असे आवाहन सचिव महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांनी कळविले आहे.

तसेच लेखक प्रकाशकांनी मंडळाकडे प्रवेशिका व पुस्तके पाठविताना सदर बंद लिफाफ्यावर पाकीटवर स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाडमय पुरस्कार 2023 साठी प्रवेशिका असा स्पष्ट उल्लेख करावा.प्रवेशिका व पुस्तके स्विकारण्याचा अंतिम 31 जानेवारी,2024 हा राहील.विहित कालमर्यादेनंतर 1 जानेवारी,ते 31 जोनवारी,2024 येणाऱ्या प्रवेशिका स्पर्धेसाठी स्विकारल्या जाणार नाहीत.यांची संबंधितांनी नोंद घ्यावी.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणासाठी गावनिहाय सुक्ष्म नियोजन करा - विजयलक्ष्मी बिदरी

Thu Jan 4 , 2024
– सर्वेक्षणासाठी प्रगणकांची नेमणूक व प्रशिक्षणाचे नियोजन करण्याच्या सूचना नागपूर :- विभागात मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे राज्य मागासवर्गीय आयोगातर्फे करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणाकरिता सर्व जिल्ह्यांनी सर्वेक्षण करावयाची कुटुंबे, सर्वेक्षणासाठी प्रगणकांची नेमणूक व त्यांचे प्रशिक्षण, आवश्यकतेनुसार सुरक्षा पुरविणे आदिंबाबत गावनिहाय सुक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी‍ बिदरी यांनी आज अधिकाऱ्यांना दिले. मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याबाबत राज्य मागासवर्गीय आयोगाच्यावतीने राज्यात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com