उद्योजकांनी कामगारांच्या आर्थिक अडचणींना विचार करुन सर्वमान्य तोडगा काढावा –         राज्यमंत्री बच्चू कडू

कामगारांच्या विविध मागण्यांचा आढावा

नागपूर : सूतगिरणी आणि इतर कंपन्या, उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कायमस्वरुपी आणि कंत्राटी कामगारांच्या विधायक मागण्यांचा साकल्याने विचार करुन त्यांच्या मागण्यांवर सर्वमान्य तोडगा काढावा. तसेच कामगारांनी कोविड काळात कंपन्यांच्या आर्थिक अडचणींचा विचार करुन कंपनी प्रशासनास सहकार्य करावे, जेणेकरुन दोघांनाही लाभ होईल, असे आवाहन जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, कामगार मंत्री बच्चू कडू यांनी आज येथे केले. विदर्भ सिंचन भवन येथील सभागृहात जिल्ह्यातील विविध उद्योगातील कामगारांच्या मागण्यांचा त्यांनी आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

गोसीखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता आशिष देवगडे यांच्यासह कामगार विभागाचे अधिकारी, कंपन्यांचे अधिकारी आणि कामगार या बैठकीला उपस्थित होते.

 गेल्या दोन वर्षांपासून कोविड महामारीमुळे सर्वच उद्योग, व्यवसाय आर्थिक संकटात सापडले आहेत. असे असले तरीही उद्योजकांनी, कंपनी प्रशासनाने कामगारांच्याही विधायक मागण्यांचा विचार करुन त्यांनी शक्य होईल अशी अधिकाधिक मदत करावी. आणि सर्वमान्य तोडगा काढावा, असे आवाहन कडू यांनी यावेळी उद्योजकांना केले. उद्योग अडचणीत असला तरीही कामगारांना दैनंदिन गरजा भागवताना त्यांची आर्थिक कुचंबणा होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच मागील थकबाकी लवकरात लवकर कामगारांच्या खात्यात जमा करावी. ही थकबाकीची रक्कम तीन किंवा चार टप्प्यात देताना सुरुवातीला अधिकाधिक ती रक्कम कामगारांना मिळेल, याकडे विशेष लक्ष द्यावे, तसेच कामगारांना विश्वासात घेऊन सर्वसमावेशक तोडगा काढून प्रश्न मार्गी लावण्याचे निर्देशही दिले.

 यावेळी सतरापूर गाव आणि कुही तालुक्यातील पुनवर्सित गावांमध्ये सौरऊर्जेची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी पाठपुरावा करावा तसेच भूसंपादनांची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच हा प्रस्ताव तयार करताना वस्तुस्थितीदर्शक बाबींवर आधारित असावा. या गावासाठी लागणारे भूसंपादन करण्यासाठी आवश्यक भूमी मिळण्यासाठी वनविभाग आणि जलसंपदा विभागांच्या जमिनीचा प्रस्ताव तयार करून हे काम प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश राज्यमंत्री बच्चू कडू यांनी संबंधित विभागाच्या अधिका-यांना दिले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

युवा चेतना मंच तर्फे कामठीत शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा

Mon Jun 6 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 6 :- महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा तारखेनुसार ३४९ वा शिवराज्याभिषेक सोहळा छत्रपती शिवाजी महाराज चौक कामठी येथे सुवर्ण पदक विजेते जे.जे काँलेज आँफ आर्ट चे अनिल गंडाईत व दैनिक देशोन्नतीचे ज्येष्ठ पत्रकार संदीप कांबळे , नागपूर जिल्हा सहकारी मजुर संघ नागपूर चे संचालक हितेश बावनकुळे , नरेश सोरते डायरेक्टर कामठी निधी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com