यवतमाळ वाशिम मध्ये उद्योजक येण्यास उत्सुक – खा.संजय देशमुख

यवतमाळ :- महाराष्ट्र राज्यात अनेक ठिकाणी औद्योगिकरण होणे आवश्यक आहे, यासाठी विविध उद्योग यवतमाळ वाशिम जिल्ह्यात आणावेत व यासाठी राज्य सरकार सर्व मदत करेल, असे आश्वासन यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांनी भारतीय उद्योग परिसंघाच्या बैठकीत नवी दिल्ली येथील द ललित हॉटेल येथे बुधवारी केले.

भारतीय उद्योग परिसंघाने (CII) आयोजित केलेल्या बैठकीत महाराष्ट्र राज्यातील नवनिर्वाचित खासदारांना ग्वाही दिली की, महाराष्ट्र राज्यात आज अनेक ठिकाणी औद्योगीकरण होणे गरजेचे आहे. ज्यामुळे अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध होईल. या मध्ये सरकारकडून आवश्यक असलेल्या सर्व स्तरावर उद्योजकांना सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे खासदार मा.संजय देशमुख यांनी दिले.

तसेच या बैठकीत यवतमाळ वाशिम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सोयाबीन व कापसाचे उत्पादन होते. यावर आधारित उत्पादन तयार करण्यात यावे, अशी सूचना या वेळी खासदार संजय देशमुख यांनी उद्योजकांना केली.

या कार्यक्रमास खा.अरविंद सावंत, खा.धनंजय महाडिक, खा.ओमराजे निंबाळकर, खा.धैर्यशील मोहिते पाटील, खा.नरेश म्हस्के, खा.अनुप धोत्रे तसेच सीआयआयचे कामत ग्रुपचे विठ्ठल कामत, चितळे उद्योग समूहाचे गिरीश चितळे, सुला वाइनचे सुजित पैठणकर, रजनीकांत बालरा, विनय जॉय, राजेश कपूर, सुनील किर्तक, अजय सप्रे आदी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मनपातील पहिल्या प्रशिक्षणार्थीला उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान

Sat Aug 3 , 2024
– मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून नियुक्ती   नागपूर :- महाराष्ट्र राज्यातील युवकांना शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देउन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत नागपूर महानगरपालिकेमध्ये विविध ४०४ पदांवर प्रशिक्षणार्थींची निवड करण्यात येणार आहे. नागपूर महानगरपालिकेत नियुक्त पहिल्या प्रशिक्षणार्थी नेहा मंडारीला शुक्रवारी (ता.२) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियुक्तीपत्र प्रदान केले. सिव्हिल […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com