संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- तहसील कार्यालय कामठी येथे १७ फेब्रुवारी सोमवारला तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. लोकशाही दिनाच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या विविध समस्या थेट प्रशासनासमोर मांडण्याची संधी मिळणार आहे. या कार्यक्रमात सर्व शासकीय विभागांचे विभागप्रमुख उपस्थित राहणार असून, नागरिकांनी आपल्या तक्रारी व अडचणी लेखी स्वरूपात सादर करून कार्यक्रमाचा लाभघ्यावा, असे आवाहन तहसीलदार गणेश जगदाळे यांनी केले आहे.