नक्षत्रांचे देणे’ या संगीत मैफिलीनं रसिक मंत्रमुग्ध

 महासंस्कृती महोत्सवाचा शुभारंभ

 आज दंडार, गोंधळ, रेला नृत्य आणि लावणी या लोककलेची पर्वणी

गडचिरोली :- फुलले रे क्षण माझे, नभ उतरू आलं, तोच चंद्रमा नभात, जांभूळ पिकल्या झाडाखाली आदी सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या गाण्यांचा नजराणा पार्श्वगायक ऋषिकेश रानडे व आनंदी जोशी यांनी आज येथे सादर करून रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्द्ध केले.

सांस्कृतिक कार्य संचालनालय व जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पटांगणात आयोजित पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचा आज थाटात शुभारंभ झाला. 

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह याच्या हस्ते दीपप्रज्वल करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. अपर जिल्हाधिकारी धनाजी पाटील, सहायक जिल्हाधिकारी ओमकार पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, समाजकल्याण सहायक आयुक्त डॉ. सचिन मडावी, आदी यावेळी उपस्थित होते.

जिल्हावासीयांना या महोत्सवाच्या माध्यमातून सांस्कृतिक मेजवानी मिळाली आहे. महासंस्कृती महोत्सवाच्या माध्यमातून स्थानिक कलावंतांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होत आहे.

पुढील चार दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन श्रीमती सिंह यांनी केले.

तुझे गीत गण्यासाठी सूर लावू दे या गाण्याने मैफलीची सुरुवात करण्यात आली. विठू माऊली तू माऊली जगाची, का रे दुरावा, मन उधान वाऱ्याचे, गोमू संगतीनं माझ्या तू येशील का, येऊ कशी प्रीया, कधी तू , अशा विविध गाण्यांची मेजवानी रसिकांना मिळाली. प्रेमक्षकांनीही टाळ्यांच्या गजराने या गाण्यांना दाद दिली.

*आज दंडार, गोंधळ, रेला नृत्य आणि लावणी या लोककलेची पर्वणी*

16 ते 20 फेक्रुवारी दरम्यान होत असलेल्या या पाच दिवसीय महोत्सवात गीत, संगीत, नाट्य, हास्यजत्रा आणि झाडीपट्टी नाट्यकलेची रसिकांना मेजवानी अनुभवता येणार आहे. उद्या १७ फेब्रुवारी रोजी दंडार, गोंधळ, रेला नृत्यासचे सादरीकरण झाडीपट्टी गृपचे हरिचंद्रा बोरकर करणार असून प्रसिद्ध मेघा घाटगे व त्यांचा संच लावणी कार्यक्रम सादर करणार आहेत.

पाचही दिवसाचा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असणार असून जास्तीत जास्त रसिकांनी या महोत्सवाला उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे अपर जिल्हाधिकारी धनाजी पाटील यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Dr Manohar Chaskar to be new VC of SRTMU, Nanded

Sun Feb 18 , 2024
Mumbai :-The Governor of Maharashtra and Chancellor of state Universities Ramesh Bais has appointed Dr Manohar Ganpat Chaskar as the new Vice Chancellor of the Swami Ramanand Teerth Marathwada University (SRTMU) Nanded. Dr Manohar Chaskar is presently serving as the Dean (Incharge) Faculty of Science and Technology at Savitribai Phule Pune University and Principal of Prof. Ramkrishna More College, Pune. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com