रविवारी अभियंता दिन

– उत्कृष्ट अभियंत्यांचा सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते गौरव

नागपूर :- सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अभियंता दिनाच्या निमित्ताने उत्कृष्ट अभियंता पुरस्कार-२०२३-२४ कार्यक्रमाचे आयोजन रविवार दिनांक १५ सप्टेंबर रोजी करण्यात आले आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अभियंत्यांचा गौरव करण्यात येणार आहे.

कविवर्य सुरेश भट सभागृह रेशीमबाग येथे अभियंता दिनाचे आयोजन रविवारी सकाळी १०.३० वाजता करण्यात आले आहे. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उप्पर मुख्य सचिव मनीषा पाटनकर-म्हेसकर उपस्थित राहणार आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) सदाशिव साळुंके, सचिव (इमारती) संजय दशपुते, सचिव सतीश कोळीकर, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे सचिव सतीश चिखलीकर, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील तसेच विकास रामगुंडे सार्वजनिक बांधकाम नागपूर प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता दिनेश नंदनवार, अधिक्षक अभियंता जनार्दन भानुसे आदी उपस्थित राहणार आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भाजप राष्ट्रहितासाठी तर काँग्रेस सत्तेसाठी काम करते - वने व सांस्कृतिक कार्य मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांचे टीकास्त्र

Sat Sep 14 , 2024
– भाजप जिल्हा व महानगरतर्फे ‘संविधान बचाओ, काँग्रेस हटाओ’ आंदोलन चंद्रपूर :- काँग्रेस सत्तेपासून दूर राहिली तरच देशात सुख, शांती, समृद्धी नांदू शकते. कारण काँग्रेस सत्तेसाठी जगते तर भाजप राष्ट्रहितासाठी काम करते. त्यामुळे राष्ट्रहित साधायचे असेल, तर काँग्रेसला दूर ठेवावे, असे आवाहन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. राहुल […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!