संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :-आनंद नगर येथील बोधिसत्व बुद्ध विहारात वर्षावास समाप्ती सोहळ्याचे आयोजन नुकतेच करण्यात आले. प्रारंभी भंतेजी च्या हस्ते दिप प्रज्वलन करून तथागत भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करण्यात आली.
भंतेजी नी सामूहिक बुद्ध वंदना करुन कार्यक्रमास सुरुवात केली.
कार्यक्रमात परित्राण पाठ,चिवर दान,भोजन दान करण्यात आले वर्षावास कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी संध्या रायबोले, गंगा नागदेवे,हर्षाली साखरे,सोनू खोब्रागड़े,आरती वाघमारे, संगीता मेश्राम, भारती खोब्रागडे,सुनंदा लांजेवार, सुप्रिया मेश्राम,मिनाक्षी खोब्रागडे,सुवर्णा साखरे,रिना रामटेके,उषा गजभिये,शिल्पा मेश्राम, विद्या बोंबले,जया मेश्राम यांनी सहकार्य केले.