नागपूर :- नागपूर शहरातील फुटपाथ आणि रस्त्यांवरील अतिक्रमणाविरोधात नागपूर महानगरपालिकेद्वारे सर्वत्र धडक कारवाई सुरू आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार संपूर्ण शहरातील कारवाईला गती देण्यात आली आहे.
मनपाचे अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर यांच्या नेतृत्वात नागपूर महानगरपालिकेच्या प्रवर्तन विभागामार्फत शहरातील विविध ठिकाणच्या अतिक्रमणाविरोधात धडक कारवाई केली जात आहे. गुरुवार(ता: १) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय समोर आणि महाल परिसरातील अतिक्रमणाविरोधात कारवाई करण्यात आली. याठिकाणीहून ६ ट्रक वस्तू जप्त करण्यात आल्या, अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर यांनी अतिक्रमण कारवाईची प्रत्यक्ष पाहणी केली, याप्रसंगी सहायक आयुक्त हरीश राऊत, प्रवर्तन अधिक्षक अधीक्षक संजय कांबळे, कनिष्ठ अभियंता भास्कर माळवे प्रामुख्याने उपस्थित होते.
नागपूर महानगरपालिका प्रवर्तन विभागामार्फत आयुक्त म. न .पा नागपूर त्यांच्या आदेशावय रोजी गांधीबाग झोन क्र ०६ अंतर्गत झोन कार्यालय ते चित्तर ओली चौक ते महाल चौक ते गडकरी वाडा परिसर ते नंगा पुतला चौक ते बडकस चौक ते लकडापूल चौक ते कल्याणेश्वर मंदिर परिसर दुपारनंतर परत कारवाई करण्यात आली ज्यामध्ये संयुक्तरीत्या अतिक्रमण पथक महाल चौक ते बडकस चौक ते नंगा पुतला चौक ते शहीद चौक ते तीन नंतर ते परत नंगा पुतला चौक पर्यंत अतिक्रमण ची कारवाई करण्यात आली ज्या मध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजू वरील रोड व फूटपाथ वर अवैध पद्धतीने लावण्यात आलेले ठेले व दुकान हटविण्यात आले असे अंदाजे 02 ट्रक साहित्य जप्त करण्यात आला कारवाई दरम्यान माननीय श्री. अजय चारठाणकर अतिरिक्त आयुक्त (सामान्य) मनपा नागपूर यांच्या प्रत्यक्षरीत्या कारवाई मध्ये उपस्थित असून यांच्या उपस्थित मध्ये कारवाई करण्यात आली.
आयुक्त म. न .पा नागपूर त्यांच्या आदेशावय धंतोली झोन क्र ०४ अंतर्गत संयुक्तरित्या दोन्ही अतिक्रमण पथक झोन कार्यालय ते मेडिकल चौक ते अजनी रोड ते अशोक चौक ते बैद्यनाथ चौक ते मशाल चौक पर्यंत अतिक्रमण ची कारवाई करण्यात आली ज्या मध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजू वरील रोड व फूटपाथ वर अवैध पद्धतीने लावण्यात आलेले ठेले व दुकान हटविण्यात आले असे अंदाजे 05 ट्रक साहित्य जप्त करण्यात आला दुपारनंतर परत कारवाई करण्यात आली संयुक्तरित्या दोन्ही अतिक्रमण पथक झोन कार्यालय ते बैद्यनाथ चौक ते मेडिकल चौक ते अशोक चौक ते परत मेडिकल चौक ते टी. बी वार्ड चौक पर्यंत अतिक्रमण ची कारवाई करण्यात आली ज्या मध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजू वरील रोड व फूटपाथ वर अवैध पद्धतीने लावण्यात आलेले ठेले व दुकान हटविण्यात आले. असे अंदाजे 04 ट्रक साहित्य जप्त करण्यात आले.