सहकारी बँकांना शक्ती मिळणे शेतकऱ्यांसाठी फायद्याचे – केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

– राज्य सहकारी बँकेकडे जिल्हा बँकेचे संस्थापक प्रशासकपद

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती

नागपूर :- सहकारी बँकांची समृद्धी होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे राज्य किंवा जिल्हा बँकेने सहकारी बँकांना शक्ती देणे शेतकऱ्यांसाठी फायद्याचे आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आज (रविवार) केले.

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर राज्य सहकारी बँकेची संस्थापक प्रशासक म्हणून नियुक्ती-पदभार स्वीकृतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यावेळी. ना. गडकरी बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. गांधीसागर येथील शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, आशीष जयस्वाल, आमदार आशीष देशमुख, आमदार चरणसिंग ठाकूर, राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर आदींची उपस्थिती होती.

ना. गडकरी म्हणाले, ‘जिल्हा सहकारी बँकेला पॉवरफुल्ल इंजिनची आवश्यकता होती. त्यादृष्टीने राज्य सहकारी बँकेने घेतलेली जबाबदारी स्वागतार्ह आहे. गेल्या सहा वर्षांपासून राज्य सहकारी बँक उत्तम काम करत आहे. त्यांची उलाढाल तर वाढलीच आहे, शिवाय नफाही मोठ्या प्रमाणात कमावला आहे. साखर आणि इथेनॉल उद्योगाला देखील मोठे सहकार्य बँकेने केले आहे. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून सहकारी बँकांना शक्ती मिळाली तर शेतकऱ्यांनाच फायदा होईल. विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या कर्ज पुरवठ्याचे मार्ग खुले होतील.’ बँकेचे भविष्य बदलायला सुरुवात झाली आहे. त्याचा लाभ ग्रामीण जनतेला नक्की होईल, असा विश्वासही ना. गडकरी यांनी व्यक्त केला.

बँकांवर शेतकऱ्यांची जबाबदारी – मुख्यमंत्री

जिल्हा सरकारी बँक चांगली असेल तर शेतकऱ्यांना फायदा होतो. आज जिल्ह्यातील अनेक बँका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत करत आहे. जिल्हा आणि राज्य सहकारी बँकेवर शेतकऱ्यांची मोठी जबाबदारी आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. सहकारातून समृद्धीच्या दिशेने प्रवास सुरू झाला असल्याचेही ते म्हणाले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

नागपूरची टँकर मुक्तीच्या दिशेने वाटचाल

Tue Apr 1 , 2025
– धरमपेठ, नेहरूनगर, हुडकेश्वर-नरसाळा व मंगळवारी झोन टँकरमुक्त नागपूर :- नागपूर शहराला टँकरमुक्त करण्यासाठी महापालिकेतर्फे विविध पावले उचलली जात असून शहरातील धरमपेठ, नेहरूनगर, हुडकेश्वर-नरसाळा व मंगळवारी झोन टँकर मुक्त झाले आहेत. अमृत योजना २ अंतर्गत जलवाहिन्या व फिडर लाईन टाकण्याची कामे येत्या मे महिन्यात पूर्णत्वास जाणार आहे. अमृत योजनेअंतर्गत नागपूर महापालिकेच्या कार्यक्षेत्रात राबविण्यात येत असलेल्या अधिकृत, अनधिकृत, झोपडपट्ट्यांमध्ये पाणी पुरवठा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!