सांस्कृतिक धोरण अंमलबजावणीत कौशल्य विकासावरही भर – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार 

मुंबई :– राज्य सांस्कृतिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करतानाच यातून काही कौशल्य विकास करणारे अभ्यासक्रम सुरु करुन तरुणांना रोजगाराच्या नाविन्यपूर्ण संधी उपलब्ध करून कशा देता येतील, याचा कृती आराखडा तयार करण्यात यावा, असे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी सांगितले.

राज्याचे सांस्कृतिक धोरण अंमलबजावणीसाठी माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीची बैठक मंत्रालयात सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. शेलार यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

मागील कार्यकाळात धोरण निर्मितीत योगदान दिलेले सदस्य आणि नव्या अंमलबजावणी समितीच्या सदस्यांसोबत ही बैठक झाली. राज्याच्या सांस्कृतिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महत्त्वपूर्ण चर्चा यावेळी झाली. मान्यवरांनी विविध सूचना मांडल्या.

यावेळी पद्मश्री गिरीष प्रभुणे, संगीतकार कौशल इनामदार, श्रीमती अनिता यलमटे, आचार्य शाहीर हेमंतराजे पु. मावळे, सुनील दादोजी भंडगे, लेखक अभिराम भडकमकर, शितूदादा म्हसे, पत्रकार राजेश प्रभु साळगावकर, जगन्नाथ कृष्णा दिलीप, दर्शनिका विभाग कार्यकारी संपादक व सचिव. डॉ. दिलीप बलसेकर, सांस्कृतिक संचालक विभीषण चवरे, पुराभिलेख संचालनालय संचालक सुजितकुमार उगले, साहित्य अकादमी सहसंचालक सचिन निंबाळकर, रंगभूमी परिनिरीक्षण सचिव संतोष खामकर यावेळी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र सागर मंडळाची कामकाज आढावा बैठक

Tue Mar 4 , 2025
मुंबई :- महाराष्ट्र सागरी मंडळाच्या कामकाजासंदर्भात मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. यावेळी महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी, मुख्य अभियंता राजाराम गोसावी, वित्त नियंत्रक व मुख्य लेखाधिकारी सारंगकर, उपजिल्हाधिकारी अंजली भोसले , महाव्यवस्थापक रोहित पुरी, उपसंचालक (आशियाई विकास बँक) डॉ.महेश चंदूरकर उपस्थित होते. मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे म्हणाले की, महाराष्ट्राला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!