पात्र, गरजू लाभार्थ्यांची निवड करा; आर्थिक शिस्त पाळा -उपमुख्यमंत्री अजित पवार

 

सर्वच महामंडळाच्या मंजूर निधीचे तातडीने वितरण करण्याचे निर्देश

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचा आढावा

 

 मुंबई : अण्णासाहेब पाटील आर्थिक‍ मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करतानाकाटेकोरपणे आर्थिक शिस्त पाळा. महामंडळाच्या योजनांचा लाभ अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविताना समाजातल्या पात्रगरजू लाभार्थ्यांची निवड करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. त्याचबरोबर सर्व महामंडळांसाठी तरतूद करण्यात आलेल्या निधीचे तातडीने वितरण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी संबंधित यंत्रणेला दिले.

            अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कामाचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयातील समिती कक्षात घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी वित्त विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवराअण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. नामदेव भोसलेनियोजन विभागाचे उपसचिव श्री. देसाईनियोजन विभागाचे अवर सचिव श्री. बोरकरवित्त विभागाचे सहसचिव श्री. दहीफळे उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेराज्यातील सर्व समाजघटकांच्या शैक्षणिकआर्थिक उन्नतीसह समतोल सामाजिक प्रगती साधण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने वेगवेगळ्या प्रवर्गासाठी विविध विकास महामंडळाच्या माध्यमातून योजना राबविण्यात येतात. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील सुशिक्षीत बेरोजगार तरुणांना शेतीपूरक व्यवसायविपणनप्रक्रियाउद्योगपुरवठा आणि साठवणूकीबरोबरच लघू उद्योगवाहतुकअन्य व्यवसायिक उद्योगासाठी आर्थिक मदत करताना राज्यातील सर्व भागातील जास्ती-जास्त तरुणांना या योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न करावा, असेही श्री.पवार यांनी सांगितले.

            अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाबरोबरच महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळश्यामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी व मेंढी विकास महामंडळलोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळमौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळवसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळसंत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळासह इतर सर्व महामंडळासाठी तरतुद केलेल्या निधीचे तातडीने वितरण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

मंगळवारी जिल्ह्यात 68 कोरोना पॉझिटिव्ह तर 06 रुग्णांना डिस्चार्ज

Tue Jan 11 , 2022
एकूण डिस्चार्ज58996 एकूण पॉझिटिव्ह60384 क्रियाशील रुग्ण254 आज मृत्यू शून्य एकूण मृत्यू1134 रिकव्हरी रेट98.00 टक्के मृत्यू दर01.88 आजच्या टेस्ट1496 एकूण टेस्ट493223 भंडारा, दि. 11 :  जिल्ह्यात मंगळवारी 68 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून आज (दि.11) बरे झालेल्या रुग्णांची संख्या 06 आहे. मंगळवारी 1496 व्यक्तींची चाचणी केली असता 68 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता 254 सक्रिय रुग्ण आहे. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 58996 आहे तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 60384 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.00 टक्के आहे. आतापर्यंत 04 लाख 93 हजार 223 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यात 60384 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!