7 औद्योगिक ग्राहकांकडील 52 लाखाची वीजचोरी उघड

नागपूर :- महावितरणचे भरारी पथक आणि लष्करीबाग उपविभाग यांनी संयुक्तपणे राबविलेल्या औद्योगिक ग्राहकांकडील वीजचोरी विरोधी मोहीमेत सात औद्योगिक ग्राहकांकडील सुमारे 52 लाख 55 हजाराची वीजचोरी उघडकीस आली आहे. यापैकी चार ग्राहकांनी वीजचोरीच्या 18 लाख 25 हजार 999 आणि तडजोडीपोटी 10 लाख 60 हजार दंडाच्या रकमेचा भरणा देखील केला.

महावितरणच्या लष्करीबाग उपविभागांतर्गत नागपूर शहर आणि नागपूर ग्रामीण मंडलांचे भरारी पथक व लष्करीबाग उपविभागातील अभियंता आणि कर्मचा-यांनी राबविलेल्या या संयुक्त मोहीमेत नारी आणि कामठी रोड परिसरातील सात ग्राहकांकडील तब्बल 3 लाख 14 हजार 753 युनिटची वीजचोरी उघडकीस आली. या चोरीचे अंदाजित मुल्य सुमारे 52 लाख 55 हजार 140 रुपये असून या सातही ग्राहकांविरोधात भारतीय विद्युत कायद्याच्या कलम 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या सातपैकी सहा प्रकरणांत दुस-या ग्राहकाकडील इनकमिंग केबलला टॅप करुन मीटर बायपास करण्यात आला होता तर एका ठिकाणी रिमोटच्या सहाय्याने वीजचोती होत असल्याचे निदर्शनास आले. या सातही वीज ग्राहकांना वीजचोरीपोटी 52 लाख 55 हजार 140 रुपये अधिक तडजोडीपोटी 20 लाख 90 हजाराच्या दंडाची आकारणी करण्यात आली यापैकी चार ग्राहकांनी वीजचोरीसाठी 18 लाख 25 हजार 999 आणि तडजोडीपोटी 10 लाख 60 हजार दंडाच्या रकमेचा भरणा देखील केला.

ही मोहीम महावितरणचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, मुख्य अभियंता दिलीप दोडके, अधीक्षक अभियंता  अमित परांजपे, उपसंचालक (सुरक्षा व अंमलबजावणी) सुनिल थापेकर, कार्यकारी अभियंता राजेश घाटोळे यांच्या मार्गदर्शनात अतिरीक्त कार्यकारी अभियंता सर्वश्री हेमेंद्र गौर, श्रीकांत तळेगावकर आणि विवेक राऊत आणि त्यांच्या सहका-यांनी यशस्वीपणे पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पीएम विश्वकर्मा योजनेच्या कार्यशाळेतून या योजनेला गती मिळावी, जिल्ह्यातील कारागिरांची जास्तीत जास्त नोंदणी व्हावी - जिल्हाधिकारी

Wed Jan 10 , 2024
भंडारा :- पीएम विश्वकर्मा योजनेतून जिल्ह्यातील लाभार्थ्यांची संख्या वाढावी व योग्य त्याला भारतीय पर्यंत पीएम विश्वकर्मा पोहोचावी यासाठी कार्यक्षेच्या आयोजन करण्यात आले आहे या कार्यशाळेमधून संबंधितांनी आपले शंका निरसन करून घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी आज केले. आज नियोजन सभागृहात पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेची एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com