नागपूर, ता. १४ : नागपूर महानगरपालिकेच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीचे प्रारूप प्रभाग रचना १ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आली होती. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या आवाहनानंतर मनपा निवडणुकीच्या जाहीर केलेल्या प्रभाग रचनेबाबत सोमवारपर्यंत (ता. १४) एकूण ११७ हरकती व सूचना प्राप्त झाल्या. सोमवारी शेवटच्या दिवशी ४४ सूचना व हरकती प्राप्त झाल्या असून त्यापूर्वी ७३ सूचना प्राप्त झाल्या होत्या.
प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर १ ते १४ फेब्रुवारी दरम्यान मनपा निवडणूक कार्यालय सिव्हिल लाईन्स किंवा झोन कार्यालयात हरकती व सूचना जमा करण्याचे आवाहन मनपा मनपा आयुक्तांनी केले होते. प्राप्त हरकती व सूचनांवर सुनावणी करण्याकरिता संबंधित नागरिकांना कळविण्यात येणार आहे.
नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी एकूण १५६ सदस्यांकरीता ५२ प्रभागाचे प्रारूप नकाशे जाहीर करण्यात आले. जाहीर सर्व ५२ प्रभाग ३ सदस्यांचे आहेत.