संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक निरीक्षक सुनील कुमार यांनी कामठी तहसील कार्यालयात भेट दिली यावेळी त्यांनी कामठी विधानसभा मतदार संघातील निवडणूक यंत्रणेची पाहणी केली आणि या प्रक्रियेत सहभागी असलेल्या सर्व विधानसभा स्तरीय अधिकाऱ्यांचा आढावा घेतला.सदर आढावा सभेत निवडणूक निरीक्षक यांनी विधानसभा स्तरावर होणाऱ्या प्राप्त होणाऱ्या सी व्हिजिल तक्रारींचे तात्काळ निपटारा करणे,नियंत्रण कक्षाच्या संपर्क क्रमांकाला प्रसिद्धी देणे तसेच सदर बैठकीत मतदान पथकाला संक्षिप्त प्रशिक्षण देण्याचे अचूक नियोजनावर भर देण्याबाबतचे निर्देश निवडणूक यंत्रणेला दिले.तसेच निवडणूक निर्णय अधिकारी,सहाय्यक निवडणूक अधिकारी, नोडल अधिकारी यांच्या कामाचा त्यांनी आढावा घेत निगराणी पथक, फिरते पथक,छायाचित्रीकरण फिरते पथक,छायाचित्र पाहणी पथक,निवडणूक खर्चविषयक पथक,शेडो मतदान केंद्राची माहिती, कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रशिक्षण, साहित्य देणे, साहित्य परत घेणे,ईव्हीएम विव्हीपेट अभिरक्षा गृह मतमोजणी केंद्राची व्यवस्था,महिला मतदान केंद्र,विशेष मतदान केंद्र,नियंत्रण कक्ष,आचारसंहिता कक्ष, संपर्क केंद्र, तक्रार निवारण कक्ष, परवानगी केंद्र आदींची माहिती घेत त्यांनी आवश्यक त्या सूचना दिल्या.या बैठकीचे सादरीकरण निवडणूक निर्णय अधिकारी सचिन गोसावी यांनी केले तर या बैठकीत समनव्य अधिकारी प्रशांत भांडारकर, सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल क्षीरसागर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गणेश जगदाळे,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दत्तात्रय निंबाळकर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब येवले,मुख्याधिकारी संदीप बोरकर,नायब तहसीलदार उपेश अंबादे,नायब तहसीलदार मयूर चौधरी आदी उपस्थित होते.