नागपूर :- नागपूर जिल्ह्यातील ३६५ ग्रामपंचायतमध्ये पाच नोव्हेंबरला ग्रामपंचायतची निवडणूक होणार आहे. तर बारा ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणुका होणार आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने या संदर्भातील अधिकृत घोषणा केली असून राज्यात २ हजार ३५९ ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे.
उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया १६ ते २० ऑक्टोबर, उमेदवारी अर्जाची छाननी २३ ऑक्टोबर, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख २५ ऑक्टोबर दुपारी तीन पर्यंत आहे. २५ ऑक्टोबरला निवडणूक चिन्हांचे वाटप होईल मतदान ५नोव्हेंबरला सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत होईल. तर सहा नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.