एकता मंच कन्हान सलुन दुकानदार संघाची कार्यकारणी जाहीर अध्यक्ष पद्दी किशोर गाडगे तर सचिव सुधिर पुंडे ची निवड.  

कन्हान : – कोरोना काळा पासुन प्रलंबित असलेली दुकानदार कार्यकारणी सोमवारी महाकाली कॉम्लेक्स कन्हान येथे शहरातील समस्त सलुन दुकानदार एकत्र येऊन सर्वानुमते अध्यक्ष पद्दी किशोर गाडगे तर पुंडे सचिव सुधिर पुंडे ची निवड करून कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

सोमवार (दि.५) डिसेंबर ला महाकाली कॉम्लेक्स कन्हान येथे एकता मंच कन्हान सलुन दुकानदार संघा व्दारे शहरातील समस्त सलुन दुकानदारांची बैठक घेण्यात आली. यात मागील असोसिएशन चा नियमित शेवटचा सोमवार बंद ला शिक्का मोर्तब करण्यात आला. नाभिक नेते नरेश लक्षणे, ओबीसी नेते शरद वाटकर यांचे हस्ते नवनियुक्त अध्यक्ष किशोर गाडगे व सचिव सुधिर पुंडे हयांचे पुष्पगुच्छाने स्वागत करून कार्यकारणी अध्यक्ष- किशोर गाडगे, सचिव सुधीर पुंडे, कार्याध्यक्ष दत्तु खडसे, मार्गदर्शक राजु सूर्यवंशी, उपाध्यक्ष छत्रपती येस्कर, भगवान कावळे, सहसचिव संदीप माहुलकर, रोशन बोरकर, कोषाध्यक्ष राजेंद्र घोटेकर, सहकोषाध्यक्ष अजय चन्ने, प्रचार प्रमुख प्रफुल आगाशे आदीची नियुक्ती करून कार्यकारणी जाहीर करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संतोष दहिफळकर यांनी तर आभार मिथुन सूर्यवंशी यांनी व्यकत केले. याप्रसंगी प्रशांत लक्षणे, सुनील उंबरकर, पुंड साहेब, अरमान अंजनकार, गोपाल लाडेकर, आकाश चौधरी, पिंटु निंबाळकर, अनकर बंधु, राकेश ठाकुर, आकाश पंडितकर आदी नाभिक समाज बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण व सामुहिक शेततळे या घटकाच्या प्लास्टीक फिल्म वितरक व विक्रेतांची नोंदणी

Wed Dec 7 , 2022
15 डिसेंबरपर्यंत अर्ज मागविले नागपूर :- कृषी विभागाच्या योजनेतंर्गत वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण व सामुहिक शेततळे या घटकाच्या प्लास्टीक फिल्मचा (रीइनफोर्सड एचडीपीई जीओ मेंबरेनफिल्म IS:15351:2015 Type ) पुरवठा करणा-या वितरक व विक्रेता यांची नोंदणी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नागपूर कार्यालयाकडे करावयाची आहे. ज्या उत्पादक कंपन्या महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ, पुणे यांच्याकडे राज्यस्तरीय नोंदणीकरीता पात्र असतील अशा कंपन्याचे वितरक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com