जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्राला पुढे नेण्याचा प्रयत्न – पालकमंत्री संजय राठोड

– दारव्हा तालुका कला, क्रीडा, कबबुलबूल महोत्सवाचे उद्घाटन

यवतमाळ :- जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्राला पुढे नेण्यासाठी माझी सातत्याची भूमिका राहिली आहे. त्यामुळेच माँडेल शाळेसारखा उपक्रम आपण राबवतो आहे. राज्यातील हा पहिलाच उपक्रम आहे, असे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

दारव्हा तालुकास्तरीय कला, क्रीडा, कबबुलबूल महोत्सवाचे आयोजन तालुक्यातील रामगाव (रामे) येथे करण्यात आले आहे. महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री बोलत होते. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष कालिंदा पवार, सरपंच उन्नती राऊत, तहसिलदार रवींद्र काळे, गटविकास अधिकारी बाळासाहेब रायबोले, गटशिक्षणाधिकारी विलास जाधव, कृषी अधिकारी राजीव शिंदे, शाळा समिती अध्यक्ष शेख नब्बू शेख बन्नू, सदस्य यशवंत पवार, शालेय पोषण अधीक्षक वंदना नाईक, शिक्षण विस्तार अधिकारी क्रांती खेडकर आदी उपस्थित होते.

खाजगी शाळांमध्ये भरमसाठ फी आकारली जाते. त्यामुळे या शाळांमध्ये शिक्षणाचा फार मोठा बोझा पालकांवर पडतो. त्यामुळे शासकीय शाळांमध्येच चांगले शिक्षण उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्ह्यात आपण माँडेल स्कूल संकल्पना राबवत आहे. सद्या २०० विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा आपण घेतल्या आहे. या शाळांसह जिल्ह्यातील ईतरही शाळांमध्ये पाणी, जिम, खेळाचे साहित्य, संगणक उपलब्ध करुन दिले जात आहे. मुलांना सर्व प्रकारे उत्तम सुविधा देण्याचा प्रयत्न आहे, असे पालकमंत्री म्हणाले.

लहान स्पर्धांमधूनच मोठे खेळाडू तयार होत असतात. त्यामुळे या केवळ तालुकास्तरीय स्पर्धा नाहीत तर मुले घडविणाऱ्या स्पर्धा आहेत. कला, क्रीडा महोत्सव विद्यार्थ्यांना घडवितात. यश, अपयशाचा विचार न करता विद्यार्थ्यांनी जिंकण्याच्या जिद्दीने खेळण्याचा प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. कबबुलबुल, स्काऊट गाईड देशभक्ती, अनुशासन, सेवा भावना शिकविते. त्यामुळे कबबुलबुल मेळावे देखील विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे आहेत. शाळा शिक्षणाचे केंद्र आहे, सोबतच ते विविध प्रयोगाचे केंद्र झाले पाहिजे. तालुकास्तरीय महोत्सवाच्या आयोजनासाठी निधी वाढविण्याचा प्रयत्न करु, असे पुढे बोलतांना पालकमंत्री म्हणाले.

यावेळी शाळा समिती सदस्य यशवंत पवार यांनी देखील मनोगत व्यक्त केले. उद्घाटनानंतर क्रीडाध्वजरोहण व मशाल प्रज्वलित करण्यात आली. कबबुलबुलच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने पालकमंत्र्यांचे स्वागत केले. पालकमंत्र्यांना हस्ते सत्कार देखील करण्यात आले. खेळ व कला संवर्धन मंडळ, शिक्षण विभाग, पंचायत समितीच्यावतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

ग्राम वाचनालयाचे लोकार्पण

जिल्हा वार्षिकच्या नाविण्यपूर्ण योजनेतून गाव तेथे वाचनालय उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत रामगाव (रामे) येथे सुरु करण्यात आलेल्या ‘ग्राम वाचनालया’चे लोकार्पण यावेळी पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते करण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

महाबीज उत्कृष्टता केंद्र पैलपाडा येथे रब्बी शिवार फेरीचे आयोजन

Sat Feb 1 , 2025
यवतमाळ :-  महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ महाबीजमार्फत महाबीज उत्कृष्ठता केंद्र, पैलपाडा येथे दिन. 4 फेब्रुवारी पर्यंत शिवार फेरी रब्बीचे आयोजन करण्यात आले आहे. शिवार फेरीचे उद्घाटन महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक योगेज कुंभेजकर यांचे शुभहस्ते तसेच महाबीजचे संचालक वल्लभरावजी देशमुख व संचालक डॉ. रणजित सपकाळ यांच्या उपस्थितीत झाले. उद्घाटन प्रसंगी महाबीज बियाणे संशोधनाची पुढील दिशा शेतकरीभिमूख राहील याची ग्वाही देऊन महाबीजच्या नवीन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!