मुख्यमंत्र्यांच्या सात कलमी कृती कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करा – डॉ. अभिजीत चौधरी

– मनपा आयुक्तांनी घेतली अधिकाऱ्यांची बैठक

नागपूर :- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निश्चित करुन दिलेल्या सात कलमी कृती कार्यक्रमाची नागपूर महानगरपालिकेमध्ये प्रभावी अंमलबजावणी व्हावी यादृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.

मुख्यमंत्र्यांच्या सात कलमी कृती कार्यक्रमाच्या अंमलबजावणी व नियोजनाच्या संदर्भात आयुक्तांनी सोमवारी (ता.१३) सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. मनपा मुख्यालतील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील आयुक्त सभाकक्षात बैठक पार पडली. बैठकीत अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर, उपायुक्त विजया बनकर, उपायुक्त सर्वश्री विजय देशमुख, मिलींद मेश्राम, प्रकाश वराडे, गणेश राठोड, अशोक गराटे, परिवहन व्यवस्थापक विनोद जाधव, उपायुक्त उपायुक्त डॉ. रंजना लाडे, अधीक्षक अभियंता  मनोज तालेवार, डॉ. श्वेता बॅनर्जी, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, सहायक आयुक्त सर्वश्री श्याम कापसे, हरीश राऊत, घनश्याम पंधरे, नरेंद्र बावनकर, विजय थुल, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांच्यासह सर्व कार्यकारी अभियंता उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी निश्चित केलेल्या प्रत्येक बाबींवर बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. मनपा आयुक्तांनी नागपूर महानगरपालिकेचे संकेतस्थळ सायबरदृष्ट्या सुरक्षित करणे तसेच संकेतस्थळ ‘यूजर फ्रेंडली’ करण्याच्या दृष्टीने सूचना केल्या. मनपाने सुरु केलेल्या सर्व सेवांचा संकेतस्थळामध्ये अंतर्भाव करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. मनपा आणि झोन कार्यालयांच्या सखोल स्वच्छतेचे देखील आयुक्तांनी निर्देश दिले. मनपाच्या दहाही झोनमध्ये स्वच्छता स्पर्धा घेण्याची देखील त्यांनी सूचना केली. झोन कार्यालय तसेच परिसरात देखील स्वच्छता राखली जावी, कार्यवाहीमध्ये जप्त साहित्य, वाहन आदी पडून असल्यास ते अन्य ठिकाणी जमा करुन त्यांच्या निर्लेखनाची कार्यवाही करण्याबाबत आयुक्तांनी निर्देश दिले. मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीच्या दर्शनी भागामध्ये लावलेल्या विभागांच्या माहिती फलकावरील माहिती अद्ययावत करणे तसेच मुख्यालय झोनमध्ये पिण्याचे पाणी, अभ्यागत कक्ष यांची व्यवस्था देखील अद्ययावत करण्याबाबत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी निर्देश दिले.

तक्रार निवारण पोर्टलवरील तक्रारी निकालात काढण्याची गती वाढविण्याबाबत सुद्धा आयुक्तांनी निर्देशित केले. पोर्टलसोबतच मनपा मुख्यालय तसेच झोनमध्ये नागरिकांकडून देण्यात येणाऱ्या तक्रारी व त्यावरील प्रतिसाद याचे रेकॉर्ड ठेवून प्रलंबित सर्व निकाली काढणे व तक्रारींच्या निराकरणासंदर्भात झोनस्तरावर चमू तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. मुख्यमंत्र्यांच्या सात कलमी कृती कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने मनपाच्या सामान्य प्रशासन विभागाकडे आयुक्तांनी नोडल विभाग म्हणून जबाबदारी निश्चित केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

प्राचीन श्री शिव मंदिर परिसर में मनाया भोगी उत्सव

Tue Jan 14 , 2025
नागपुर :- बेलिशॉप रेलवे कॉलोनी स्थित प्राचीन श्री शिव मंदिर में परिसर में प्राचीन शिव मंदिर व दक्षिण भारतीय (तेलगु) समाज के संयुक्त तत्वावधान में मकर संक्रान्ति के अवसर पर पारंपरिक पद्धति से उत्सव मनाया गया। पोगल उत्सव से पहले भोगी जलाकर उत्सव की शुरुवात की जाती है। मकर संक्रान्ति से सूर्य मकर राशि में प्रवेश कर उत्तरायण होना शुरू […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!