केंद्र शासनाच्या योजना प्रभाविपणे राबवा – आनंदराव पाटील

– विकसित भारत संकल्प यात्रेचा आढावा

यवतमाळ :- सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी केंद्र शासनाच्यावतीने विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येत आहे. या योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबवा. अधिकाधिक पात्र व गरजू लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ कसा मिळेल, अशा पद्धतीने योजनांची अंमलबजावणी करा, असे निर्देश केंद्र शासनाचे अतिरिक्त सचिव तथा विकसित भारत संकल्प यात्रेचे जिल्हा प्रभारी आनंदराव पाटील यांनी दिले.

महसूल भवन येथे त्यांनी यात्रेचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी सदर निर्देश दिले. बैठकीला जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक वैशाली रसाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालिंदर आभाळे, जिल्हा नियोजन अधिकारी मुरलीधर वाडेकर, जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार, जिल्हा विज्ञान व सुचना अधिकारी राजेश देवते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे यांच्यासह विविध विभाग प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

केंद्र शासनाच्यावतीने विविध 34 प्रकारच्या फ्लॅगशिप योजना राबविण्यात येत आहे. या योजनांचा देशभर पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. परंतू अजूनही अनेक पात्र लाभार्थी योजनेपासून वंचित आहे. अशा लाभार्थ्यांना थेट लाभ मिळवून देण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा ही मोहिम राबविण्यात आली. मोहिमेंतर्गत जिल्ह्यात झालेल्या कामाचा विभागनिहाय आढावा पाटील यांनी यावेळी घेतला.

शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांना अनेक प्रकारच्या अडचणी असतात. अशा अडचणीत त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देऊन त्यांना आपण मदत करू शकतो, ही भावना योजना राबविणाऱ्या अधिकाऱ्यांनी ठेवली पाहिजे. योजनांचा लाभ लाभार्थ्यांचे जीवनमान बदलवू शकतो. त्यामुळे आपल्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना अधिकाधिक लाभार्थ्यांना कशा देता येईल, याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे, असे पाटील म्हणाले.

विविध विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांची माहिती देखील यावेळी त्यांनी घेतली. अभियानाचे जिल्हा समन्वयक अधिकारी जालिंदर आभाळे यांनी जिल्ह्यात या अभियानांतर्गत झालेल्या कामाची माहिती सादर केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आदिवासी विकास मंत्री डॅा.विजयकुमार गावित यांचा दौरा

Wed Feb 21 , 2024
यवतमाळ :- राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॅा.विजयकुमार गावित जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे आहे. शनिवार दिनांक 24 फेब्रुवारी रोजी दुपारी 4.30 वाजता वणी येथे स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 6 वाजता झरी जामणी येथे आदिवासी लाभार्थी मेळाव्यास उपस्थिती. रात्री 9 वाजता पांढरकवडा येथे आगमण व मुक्काम. रविवार दि.25 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता पांढरकवडा येथे स्थानिक कार्यक्रमास […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com