चिमुकल्यांचे शैक्षणिक नुकसान, परिवहन मंडळाचे दुर्लक्ष

बेला :- आठ – दहा कि.मी. अंतरावरील पिपरा व मानोरीचे पाचवी ते सातवीतील अंदाजे 30 चिमुकले थंडीतही सकाळी शाळेत बेला येथे येतात. मात्र ,त्यांना शाळा सुटल्यानंतर घरी परत जाण्यासाठी 11.30 वाजताची बेला येथून बस नाही. त्यामुळे ते चिमुकले शाळेचे दोन तास पाडून सकाळी 10 वाजताच गावाकडे निघून जातात. यामध्ये त्यांचे गेल्या 7-8 महिन्यांपासून खूप शैक्षणिक नुकसान होत आहे. यासंदर्भात ,18 नोव्हें.ला परिवहन मंडळाचे वरिष्ठांकडे मेलद्वारे पत्र पाठवून बस सेवेची मागणी करण्यात आली. त्यानंतर लोकजीवन विद्यालयाचे मुख्याध्यापक सुद्धा सहाय्यक वाहतूक अधीक्षकांना बोलले. तरीपण अद्याप बस सेवा सुरू झाली नाही. त्यामुळे या चिमुकल्यांचे शैक्षणिक भवितव्य अधांतरी झाले आहे.

बस रद्द झाल्याने ते झाले दुःखी

शुक्रवार 2 डिसें.ला उमरेड सिरसी मार्गे बेला सकाळी 10:30 वाजताची बसफेरी बेला येथे आली नाही. बस मध्ये बिघाड झाल्याने ती रद्द झाली. त्यामुळे या विद्यार्थ्यांना दुपारी 3 वाजेपर्यंत उपाशीपोटी बेला येथील बसस्टैंडवर ताटकळत रहावे लागले. ही बाब आगार व्यवस्थापक गौरीशंकर भगत यांना कळविण्यात आले. परंतु विद्यार्थ्यांची कोणतीही सोय झाली नाही. अखेर उपाशी असणाऱ्या या मुलांना शासनाचे शिव भोजन देण्यात आले. दुपारच्या सुमारास आलेल्या नागपूर बेला च्या दोन बसफेरी मधील वाहक शेंद्रे व उज्जैनकर यांना आगार व्यवस्थापकांनी मुलांना त्यांचे गावी घेऊन जाण्याचे सांगितले. पण त्यांनी ऐकले नाही. त्यामुळे ते चिमुकले दुःखी मनाने बेला येथेच निराशेत बसच्या प्रतीक्षेत थांबले. यावेळी काही चिमुकले रडकुंडीला आले होते.

प्रतिक्रिया :- विद्यार्थ्यांच्या होत असलेल्या गैरसोयीबाबत अनेकदा नागपूर व उमरेडच्या आगार व्यवस्थापकांना कळविण्यात आले. त्यानंतर सहाय्यक वाहतूक अधीक्षक अभय बोबडे यांच्याशी बोललो. त्यांनी दोन चार दिवसात बस सुरू होईल. असे सांगितले. परंतु अद्याप सुरू झाली नाही . त्यामुळे या विद्यार्थ्यांचे खूप शैक्षणिक नुकसान होत आहे. बसच्या गैरसोयीने आम्ही त्यांना 11 वाजेपर्यंत शाळेत बसा. अशी शक्ती करू शकत नाही. बेला येथे सकाळी 11:30 वाजताचे सुमारास येणारी नागपूर बेला बस पुढे सिरसी पर्यंत वाढवून द्यावी. जेणेकरून विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होईल.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

IPS & much more…Part 2

Fri Dec 2 , 2022
Nagpur :- Before I start my blog on the newly recruited DCP’s of Mumbai, one good news! So my father, Journalist Hemant Joshi, yesterday in Marathi made a video on our YouTube channel (Vikrant Joshi) on the Co-operation Department that how CM Eknath Shinde & Co-op Minister Atul Save will face embarrassment if they recruit a certain Vikas Rasaal as […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com