शेणापासून तयार केल्या इको फ्रेंडली राख्या..

अमरदिप बडगे,प्रतिनिधी

राज्यासह इतर राज्यात देखील या राख्यांची मागणी…

आत्मनिर्भर होत महिलांना दिला रोजगार…

गोंदिया :- राखी सण येताच बाजारात मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या विक्री ला येतात, चीन राख्या हि मोठ्या प्रमाणात येत आहेत. असल्याने गोंदिया येथील एका महिलेने इको फ्रेंडली राखी म्हणून चक्क सेना पासून राख्या तयार केल्या आहेत. तर ह्या सेनाच्या राख्यांना जिल्ह्यासह राज्यात तसेच दुसऱ्या राज्यातही मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. तर प्रति यांना प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांच्या कडून सम्मन पत्र देखील मिळविलेला आहे.

 

हे आहेत गोंदिया तालुक्यातील चुटिया गाव येथील प्रीती टेमभरें यांनी पाच वर्षा आधी गावात गीर प्रजातीच्या गायीची गोशाळा उघडली. या गौशाळेला फक्त दुधापर्यंत मर्यादित न ठेवता या गाईच्या शेणापासून सेंद्रिय खते, अगरबत्ती तयार केली. तर गौमुत्रापासून फिनाईल, औषधेही तयार केली जातात. कोरोनाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून जनतेला आत्मनिर्भर होण्याचा सल्ला दिला होता. त्यात आता भारत-चीन सीमावाद यामुळे चीनी वस्तूवर बहिष्कार टाकण्यात येत आहे. हीच परिस्थिती लक्षात घेतात प्रीती यांना रक्षा बंधनाच्या उत्सवात गाईच्या शेणापासून इको फ्रेंडली राखी बनविण्याची संकल्पना सुचली. त्यांनी कामाला सुरुवात करत आधी या संकल्पनेबाबत अभ्यास केला आणि यानंतर आपली ही संकल्पना साकार केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

पुराच्या पाण्यातून रस्ता ओलांडताना टाटा सुमो पाण्यात गेले वाहून..

Thu Aug 11 , 2022
अमरदिप बडगे, प्रतिनिधी ४० वर्षीय माजी सैनिक गेला वाहुन ; १० तासापासून शोध मोहीम सुरु.. गोंदिया :-  जिल्ह्यातील आमगाव तालुक्या अंतर्गत येणाऱ्या किडनगिपार ते शिवणी नाल्यावर रस्ता ओलांडताना वाहून गेली टाटा सुमो गाडी. गाडीत बसलेल्या तीन लोकानांपैकी दोघे बचवीले एक गेला वाहून वाहून गेलेल्या मधये माजी सैनिक ४० वर्षीय मोहन शेंडे यांचा समावेश राहणार पदमपूर रात्रीच्या सुमारास घडली घटना आहे. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com