पूर्व नागपुरातील डॉ. आंबेडकर चौकात आमदार ॲड. अभिजीत वंजारी यांच्या शुभहस्ते झेंडा वंदनाचा कार्यक्रम संपन्न

नागपूर :- पूर्व नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक वर्धमाननगर येथे दि. 15.08.2024 रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्य झेंडा बंदनाचा कार्यक्रम नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार मा. अॅड. अभिजित वंजारी यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी मंचावर पुरुषोत्तम हजारे, माजी महापौर नरेश गावंडे, माजी विरोधी पक्षनेता तानाजी बनये, उमाकांत अग्निहोत्री, माजी नगरसेविका नयना झाडे, अनिल पांडे, हरीश खंडाईत, ब्लॉक अध्यक्ष ज्ञानेश्वर ठाकरे, पृथ्वी मोटघरे व राजेश पौनीकर उपस्थित होते.

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार मा. अॅड.  अभिजित वंजारी यांनी सर्वप्रथम स्वातंत्र्य संग्रामात शहीद झालेल्या सर्व क्रांतीकारकांना व हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करून त्यांच्या बलिदानाचा इतिहास तसेच राष्ट्रपिता महात्ला गांधीनी अहिंसेचा मार्ग अवलंबून स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व करून देशातील जनतेला स्वातंत्र्यलक्धात सहभागी होण्याकरिता प्रोत्साहित करून त्यांच्या सहकार्याने आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्याकरिता सर्व आयुष्य अर्पण केले, असे प्रतिपादन केले.

याप्रसंगी भास्कर चापले, मुजीब वारसी, नितीन रामटेककर,  मनिष वानखेडे, मनोज नौकरकर, कैलास वानखेडे, केशव घावळे, राजेश बेंगे, राजू भेंडे, पुरुषोत्तम लोणारे लक्ष्मीनारायण चड्‌डा, कुंदा हरले, बबली तायल, मनिष उमरेडकर पप्पु चौरसिया, परमेश्वर राऊत, परेश नलघडे, मुकेश गजभिये, विष्णु शर्मा, राकेश कनोजे, शरिफ दिवाण, अनिल बारापात्रे, आदिल शेख तसेच पूर्व नागपुरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे संचालन प्रविण बेलेकर यांनी केले तर आभार संगिता वालदे यांनी मानले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राजकीय गॉसिप्स आणि टॉपिक्स : भाग 1

Sat Aug 17 , 2024
श्री श्री शरद पवार सहसा अस्वस्थ होत नाहीत अगदी ते ब्रीच कँडी इस्पितळात अत्यावस्थ असताना देखील अस्वस्थ झाले नव्हते त्याच पवारांना मी खऱ्या अर्थाने आजतागायत तीन वेळा अस्वस्थपणे इकडून तिकडे आणि तिकडून इकडे येरझार्या घालताना बघितले आहे. एकदा राज्याचे मुख्यमंत्री अ.रा. अंतुले असताना ते कमालीचे अस्वस्थ झाले होते, त्यानंतर हेच पवार सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री असतांना कमालीचे अस्वस्थ अशांत मी स्वतःच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!