जातीय सलोखा जपणे हे प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य-तहसिलदार अक्षय पोयाम

संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 22:-पोलीस आणि नागरीकात सलोख्याचे संबंध असल्यास अकस्मात निर्माण झालेला कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न सहजरित्या सोडविता येते.देशद्रोही लोकांचे जातीय षडयंत्र हाणून पाडण्यासाठी जातीय सलोखा जपणे हे प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य आहे.असे मत कामठी चे तहसीलदार अक्षय पोयाम यांनी काल 21 एप्रिल ला इमलिबाग मैदान येथे आयोजित रोजा इफ्तार संमेलन कार्यक्रमात व्यक्त केले.
पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून आगामी रमजान ईद निमित्त सर्व सामाजिक संस्था कामठी द्वारा आयोजित रोजा इफ्तार संमेलन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इमाम जामा मस्जिद चे मुफ्ती जीआउरर्हमान कुरेशी तर प्रमुख पाहुणे म्हणून परिमंडळ क्र पाच चे पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित , सहाय्यक पोलीस आयुक्त नयन आलूरकर, नवीन कामठी पोलीस स्टेशन व जुनी कामठी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, माजी राज्यमंत्री ऍड सुलेखाताई कुंभारे, माजी नगराध्यक्ष मो शाहजहा शफाअत, माजी नगराध्यक्ष मायाताई चवरे,माजी नगराध्यक्ष शकुर नागांनी,भन्ते नागदिपणकर, ब्रह्मकुमारी प्रेमलता दीदी,कामठी पंचायत समिती सदस्य सुमेध रंगारी , माजी नगरसेवक मो अरशद, मो अनवर पटेल ,विजय पाटील आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधवासह सर्व सामाजिक संघटना तसेच राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर आयोजित रोजा इफ्तार संमेलनामध्ये सर्वांनी रोजा इफ्तार चा आस्वाद घेतला. कार्यक्रमाला पत्रकार,प्रतिष्ठित नागरिकांसह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

उर्दू पत्रकार व लेखक सोहेल सानी को उर्दू साहित्य अकादमी द्वारा विशेष पुरस्कार की घोषणा

Fri Apr 22 , 2022
संदीप कांबळे कामठी कामठी ता प्र 21 – महाराष्ट्र शासन के अल्पसंख्यक विकास विभाग अंतर्गत कार्यरत महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमी द्वारा उर्दू भाषा और साहित्य की उन्नति के लिए महत्वपूर्ण योगदान देने वाले साहित्यकारों पत्रकारों व अन्य को वर्ष 2019 और 2020 के लिए विभिन्न अवार्ड दिए जाने की घोषणा की गई है! कामटी के उर्दू पत्रकार और लेखक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com