संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- भारतीय संविधानाचे शिल्पकार परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान भारत देशाला अर्पण केले .भारतीयांनी हे संविधान अंगीकृत करीत अधिनियमित केले .या संविधान दिनाला आज 73 वर्षे झाले असून हया 73 व्या संविधान दिना निमित्त कामठी तालुक्यात विविध शासकीय निमशासकीय कार्यालय तसेच विविध सामाजिक व राजकीय संघटनेच्या वतीने संविधान दिन चिरायू होवो च्या गर्जना करीत कामठी तालुका दुमदुमला.
यानुसार कामठीच्या तहसिल कार्यालयात तहसिलदार अक्षय पोयाम यांच्या शुभ हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले तर प्रस्तुतकार अमोल पौंड यांनी भारतीय संविधान प्रस्ताविक उद्देशिका चे सामूहिक वाचन केले व एकमेकांना संविधान दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या याप्रसंगी ,नायब तहसिलदार नंदकुमार गोडबोले, निरिक्षण अधिकारी अर्चना निमजे, संगीता तेलपांडे ,अ.का. वैशाली मेश्राम, माधुरी उईके, ज्योती गोरलेवार, रेखा उंबरकर, नितीन टेंभुरने, कमलेश पाटील, कुंभारकर,पानतावने, शैलेश धमगाये आदी कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते
कामठी नगर परिषद कार्यालयात मुख्याधिकारी संदीप बोरकर यांच्या शुभ हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून मानवंदना वाहण्यात आली तर प्रदीप भोकरे यांच्या वतीने संविधान प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले याप्रसंगी उपमुख्यधिकारी नितीन चव्हाण,कर अधीक्षक आबासाहेब मुंडे,स्वास्थ्य निरीक्षक विजय उर्फ गफ्फु मेथीयां यासह न प अधिकारी कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येत उपस्थित होते.
कामठी पंचायत समिती कार्यालयात बीडीओ अंशुजा गराटे , शासकीय उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक नैना धुपारे, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे वैद्यकीय अधिकारी डॉ शबनम खानुनी, यांच्या मुख्य उपस्थितीत संबंधित कार्यालयात संविधान दिनानिमित्त संविधान प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करीत संविधान दिन साजरा करन्यात आला.
समता सैनिक दल च्या वतीने जयस्तंभ चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून मानवंदना वाहण्यात आली याप्रसंगी मार्शल ओमप्रकाश मेंढे, राजकुमार मेंढे, शिशुपाल बागडे, निलेश मेश्राम, संदिप रामटेके, निलेश मानवटकर, वीरेंद्र मेश्राम, प्रतिक चांदोरकर, अंशुल तांबे, अश्विन बावनगडे, शुभम रामटेके, आकाश मेश्राम, अमित बडगे, प्रशान्त गजभिये, सुमेध टेम्भूर्ने, अक्षय चिंचखेडे, ओशो मेंढे, सम्यक चांदोरकर, अंकित शेंडे, हिमांशु बावनगड़े, सुशांक बोरकर, शिशुपाल सोंडवले, मोनू बडगे,तसेच संध्या बंसोड, राजश्री सोंडवले, किरण मेश्राम, मनीषा गोंडाने, प्रियंका, आणि अनेक मार्शल्स उपस्थित होते.
कांग्रेस तर्फे माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन वाहत संविधान प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष प्रमोद उर्फ गुड्डू मानवटकर,शकुर नागांनी, इर्शाद शेख, आबीद ताजी, आशिष मेश्राम,राजन कांबळे, मनोज यादव, प्रमोद खोब्रागडे, राजकुमार गेडाम,मो सुलतान ,मंजू मेश्राम,कुसुम खोब्रागडे आदी उपस्थित होते.
भाजप तर्फे आमदार टेकचंद सावरकर,बरीएम तर्फे अजय कदम ,बसपा तर्फे इंजि.विक्रांत मेश्राम,वंचित बहुजन आघाडी तसेंच भारतीय संविधान दिन गौरव समिती कामठी, प्रोग्रेसिव्ह मूव्हमेंट तसेच भारतीय बौद्ध महासभा च्या वतीने सुद्धा जयस्तंभ चौक स्थित डॉॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पयर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले व संविधान प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.