डुलकी ने केला घात, ट्रॅव्हल्स पलटली, १० जखमी

– नागपुर – जबलपुर महामार्गावरील मरारवाडी जवळील घटना

– ५ मनसर पिएचसी तर ५ नागपुर रुग्णालयात दाखल

– सुदैवाने जिवित हानी नाही

– जखमी तामीळनाडुतिल

रामटेक :- नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील मरारवाडी जवळ ट्रॅव्हल्स चालकाला झोपेची डुलकी आल्याने ट्रॅव्हल्स रस्त्याच्या खाली उलटल्याची घटना दि.1 जून ला पहाटे ५ वाजताच्या सुमारास घडली.या अपघातात १० जन जखमी झाले असले तरी मात्र सुदैवाने कुठलीही जीवित हानी झालेली नाही.

प्राप्त माहितीनुसार, जबलपूर कडून नागपूरकडे देव दर्शनावरून येत असलेल्या ट्रॅव्हल्स क्रमांक पि.वाय. ०१ सी.यु. ५७९१ च्या चालकाला मरारवाडी परीसरात झोपेची डुलकी आल्याने चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटले व ट्रॅव्हल्स रस्त्याच्या कडेला जाऊन पलटली. या ट्रॅव्हल्स मध्ये जवळपास ३५ ते ४० यात्रेकरू असल्याचे समजले. अपघाताची माहिती ओरिएंटल टोल प्लाझा यांना कळताच अंबुलेन्स टीम डॉ.अनिल गजभिये, गणेश बघमारे , पेट्रोलिंग टीम सिद्दीकी, शुभम सोमकुवर यांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमी व्यक्तींना प्राथमिक आरोग्य केंद्र मनसर येथे नेण्यात आले. अपघातात कुठलीही जिवीत हाणी झाली नसली तरी मात्र १० जन जखमी झाले. पैकी ५ किरकोळ जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्र मनसर येथे दाखल करण्यात आले होते त्यामध्ये दा. रेड्डी (६५) पुरुष, ले. मल्लिगा (६५) महिला, के. संतमरा (७०) महीला, एल. हेमारती (७०) महीला, विनोद अप्पा (४०) पुरुष सर्व राहाणार तामिळनाडु अशी प्राथमिक आरोग्य केंद्र मनसर येथे दाखल केलेल्या जखमींची नावे आहे. तर ५ जखमीना नागपूर मेडिकल येथे रेफर करण्यात आले आहे. बाकी यात्रेकरू यांना टोल प्लाझा खुमारी येथे ठेवण्यात आले आहे.

प्रवाशांनी बाळगावी सावधगिरी

डुलकी लागुन अपघात होण्याचे प्रकार टाळण्यासाठी आता प्रवाशांनीच सावधगिरी बाळगायला हवी. विशेषतः खाजगी वाहनाने आणि तेही रात्रीच्या सुमारास प्रवासाला निघतांना रात्रप्रहरी उत्तमरित्या जागरण करू शकेल असा एखादा व्यक्ती चालकाच्या बाजुच्या सिटवर बसवावा. जेणेकरून तो चालकाच्या हरकतीवर लक्ष ठेवेल, चालकासोबत वार्तालाभ करेल तथा चालकाला डुलकी लागण्याचे प्रकार दिसताच त्याला सचेत करून वाहन थांबविण्यास लावेल व डोळ्यावर पाणि मारायला लावुन पुढील प्रवास सुकर करेल.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सिव्हर लाइन ब्लॉक केल्या प्रकरणी १५ हजाराचा दंड वसूल, स्वच्छ भारत अभियान : शोध पथकाची कारवाई

Fri Jun 2 , 2023
नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरूवार (ता.१) ९ प्रतिष्ठानांवर कारवाई करून ७० हजार रुपयांचा दंड वसूल केला. यात सिव्हर लाइन ब्लॉक केल्या प्रकरणी १५ हजाराचा दंड वसूल करण्यात आला.  मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात लक्ष्मीनगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे नेल्को सोसायटी, त्रिमूर्तीनगर जवळील विवेका रुग्णालयावर वर्ष २०२२-२३ चा कचरा शुल्क न […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!