चंद्रपुर :- चंद्रपूरची जीवनदायनी इरई नदी प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे पुन्हा मृतप्राय होत आहे. इरई नदी दाताळा पुलाजवळील ठक्कर कॉलोनी मागे दोन भागात विभाजीत होते मुख्य पात्र देवाळा बाजूचा तर दुसरे पात्र शांतीधाम मागून वाहत चोराळा पुलाजवळ संगम होत पुढे हडस्ती गावा जवळ वर्धा नदीला मिळते.मुख्य पात्र गाळ साचल्यामुळे प्रवाह हीन होत पूर्ण बुजला आहे.
त्यामुळे एक थेंब पाणी या पात्रातून वाहून जात नाही उलट शांतिधाम कडील पात्रातून मोठया प्रमाणात पाणी वाहत असल्यामुळे जनतेला तोच मुख्य पात्र वाटतो.
सन.2006 व 2013 साली मुख्य पात्र पूर्ण बुजल्या मुळे चंद्रपूरकरांना महापुराचा सामना करावा लागला. इरई बचाव जनआंदोलनाच्या मागणी नुसार तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. दिपक मैसेकर यांच्या पुढाकाराने दि 20 मे 2015 रोजी दाताळा पूल ते चोराळा पूल या 2.70 किलोमीटर मुख्य पत्राचे खोलीकरणाचे कामास सुरवात झाली पण मधेच इरई पुनःरुजीवन करिता नागपूर रोड पूल ते दाताळा पूल पर्यन्त खोलीकारण करण्यास भाग पाडल्या मुळे नकाश्यात असलेली 300 फूट रुंद नदी खोल व रुंद न करता 110 फूटच रुंद करत पैसे संपल्याचे कारण देत काम बंद करण्यात आले.मुख्य पात्र पूर्ण रुंद न झाल्यामुळे व 8 वर्षाचा काळ लोटल्यामुळे पात्र पुन्हा बुजले. जर दाताळा पूल ते हडस्ती पर्यन्त 5 फूट खोल व 90 मीटर रुंदीकरण झालं नाही तर पुढील 4 वर्षा नंतर सन 1986 व 2006 सारखा मोठा महापूर येऊन काही दिवस अर्धे चंद्रपूर पाण्याखाली राहणार असे भाकीत इरई बचाव जनआंदोलन आताच करीत आहे.आंदोलनाने सन 2006, 2013,2022 च्या महापुरा पूर्वी केलेल भाकीत पूर्ण खरं ठरलं पण 2027 चे भाकीत चुकावे, ते खरे ठरू नये असे जनआंदोलनाचे संयोजक कुशाब कायरकर यांना वाटते कारण पुरुपीडितांचे होणारे हाल व दुःख पाहवल्या जात नसल्याचं मत त्यांनी व्यक्त केल.याकरताच जनआंदोलन मागील 17 वर्षांपासून चंद्रपूरकरांना पुरापासून व इरई मृतप्राय होण्यापासून वाचविण्यासाठी निवेदन,बैठा सत्याग्रह, अणवानी पायी पदयात्रा, जलसत्याग्रह करीत दाताळा पूल ते हडस्ती पर्यंतच्या पुरास कारणीभूत ठरणाऱ्या भागाचे खोलीकरणाची मागणी आजही करीत आहे. बुधवार 22 मार्च 2023 जलसंपदा दिनी दाताळा पूल येथे अणवानी पायाने पदयात्रेने येऊन जलसत्याग्रह व त्याच दिवशी गुढी पाडवा असल्यामुळे “इरई खोलीकारण मागणीची गुढी उभारणार” असल्याने सर्वांनी सहभागी होण्याचे आव्हान जनआंदोलनाचे संयोजक व वृक्षाई चे संस्थापक कुशाब कायरकर यांनी केले आहे.