संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
-इथे बिनधास्त मृतदेहाचा खेळ मांडला जातो
कामठी ता प्र 5:-जीवन आणी मृत्यु हे एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत.मानवी जीवन हे निसर्गाचे ऋणी आहे तेव्हा निसर्गाने काळाची झडप घेतली की हे मानवी जीवन यमसदनी पोहोचते.आजच्या स्पर्धात्मक युगात प्रत्येक जवाबदार व्यक्ती हा स्वतःच्या कुटुंबासाठी व उज्वल भविष्याच्या दृष्टिकोनातून सतत धडपडत असतो त्यात जिवंतपणी त्यांना मोकळा श्वास घेता येत नाही मात्र काळाने झड़प घातली की कुटुंबाचा कायमचा निरोप घेण्यात येतो अश्या परिस्थितीत हे मृतदेह शवविच्छेदनार्थ शासकीय उपजिल्हा रुग्नलयातील शवविच्छेदन गृहात हलविले असता मागील काही दिवसांपासून या शवविच्छेदन गृहतिल केबल जळल्याच्या नावाखाली असलेल्या तंत्रिकीय बिघाडामुळे कित्येक मृतदेहाचि विद्रुपावस्था होत असल्याने या पार्थिवाचे हाल बेहाल होत असून निव्वळ अवहेलना केली जात आहे. तसेच मागील काही दिवसांपासून या शवविच्छेदन गृहात मृतदेहाचा सर्रास खेळ मांडला जातो?तेव्हा ह्या प्रकारला थांबा मिळावा अशी आवाज जनमानसात उठून हेरली आहे. तर दुसरीकडे नागरिकांच्या या मागणीला कंटाळून उपजिल्हा रुग्णालय प्रशासनावर लोकवर्गणी करून नवीन शीतगृह खरेदी करण्याची पाळी आलेली आहे तर या क्षेत्रात दोन आमदार असूनही यांच्या कार्यक्षेत्रातच मांडून ठेवलेला हा मृतदेहाचा खेळ चिंतनीय आहे.
माजी पालकमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळें यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या कामठी शहर हे तालुकादर्जा प्राप्त आहे.या शहराची लोकसंख्या लाखोंच्या घरात असून हे शहर व शासकीय उपजिल्हा रुग्णालय राष्ट्रीय महामार्ग क्र 7 वर वसलेले आहे या शहराच्या मध्यभागी मुंबई हावडा रेल्वे मार्ग असून या शहराचा भौगोलिक व्याप लक्षात घेता तालुक्यात एकुन 77 गावाचा समावेश असून ग्रामीण भागातव प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत तसेच लागूनच असलेल्या पारशिवणी तालुका अंतर्गत येणारे गावे मनसर , कन्हान आदी गावातील शव वैद्यकीय अभिप्रायासाठी कामठी च्या शास्कोय उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात येते मृतदेहामध्ये विशेषता अपघाती, विषप्प्राशन, संशयित हल्ला, आत्महत्या, अनोळखी मृतदेह असे विविध कारणे असलेले मृतदेह शवविच्छेदनार्थ कामठी उपजिल्हा रुग्णालयाच्या शविच्छेदनगृहात येत असतात .कामठी शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्यविष्यक समस्याची जान घेवून जागतिक बाँकेच्या दोन कोटि 76 लक्ष रूपयाच्या निधितून राज्य आरोग्य प्रकल्प अन्तर्गत 17 डिसेंबर 2002 ला या ग्रामीण रुग्नलयाचे विस्तारीकरण करून 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय कार्यरत करण्यात आले तर या शासकीय उपजिल्हा रुग्नलयला मिळत असलेला नागरिकांच्या प्रतिसाद व त्यात नागरिकांना मिळणाऱ्या आरोग्य सोई सुविधा ची जाणीव घेत शासनाच्या 2 करोड़ 92 लक्ष रूपयाच्यानिधीतून हे 50 खाटाचे रुग्णालय 100 खाटाचे विस्तारीकरण करण्यात आले.कामठी शहर व ग्रामीण तसेच लगतच्या परिसरात आकस्मिक मृत्यू, खून, गळफास ,विषष्प्राशन , अपघाती मृत्यू यासारख्या घटना घडल्यास वा अनोळखी मृतदेह आढळल्यास मृतदेहाचे शवविच्छेदन होणे हे गरजेचे असते यासाठी शासकीय उपजिल्हा रुग्णालय परिसरातच शवविच्छेदन गृहाची सुद्धा सोय करण्यात आली असून या शवविच्छेदन गृहात मृतकाच्या पार्थिवावर शवविच्छेदन करण्यात येते.या शवविच्छेदन गृहात मृतदेहाच्या शवविच्छेदनास शवविच्छेदन गृहात शितगृहाची सोय करण्यात आली आहे मागील काही दिवसांपासून श्वविच्छेदनार्थ आलेल्या कित्येक मृतदेह हे विद्रूपवस्थेत झाल्याने कौटुंबिक सदस्यांना त्या मरणाच्या वेळी सुद्धा मृतदेहाची अशी अवहेलना होत असल्याने कौटुंबिक भावना दुखावल्या जात आहेत तर अनोळखी मृतदेह आढळल्यास ओळख पटविण्यासाठी किमान दोन दिवस तरी शवगृहात सुरक्षित ठेवावे लागते मात्र येथील शीतगृह मशीन बिघाड असल्याने मृतदेह कुजलेल्या अवस्थेत येण्याच्या घटना घडल्या आहेत मात्र सदयस्थितित निकामी अवस्थेत असलेल्या शीतगृह तसेच शवविछेदन गृहतिल दुरावस्थेकडे लक्ष पुरवित नसल्याने नागरिकात संबंधित प्रशासन विषयी नाराजग़ीचा सुर वाहत आहे.