महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड
(नागपूर मेट्रो रेल प्रकल्प)
• एकूण प्रवासी संख्येच्या ३० % विद्यार्थी मेट्रोने रोज करतात प्रवास
नागपूर :- मेट्रो भाड्याचे सुसूत्रीकरण आणि दर १० मिनिटांनी मेट्रो सेवा सुरु झाल्याने शालेय-कॉलेज मध्ये जाणारे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात मेट्रोचा उपयोग करत असल्याचे निदर्शनास आले आहेत. मेट्रोने रोज प्रवास करणाऱ्या एकूण प्रवाश्यांपैकी सुमारे ३० % विद्यार्थी असून आपल्या घरापासून ते शैक्षणिक संस्थेमध्ये ये-जा करत आहे.
नागपूर मेट्रोचा प्रवास स्वस्त, सुरक्षित आणि आरामदायक असल्यामुळे मेट्रोला पसंती देत आहे. नागपूर मेट्रोची प्रवासी सेवा हि सकाळी ६ वाजता पासून रात्री १० वाजता पर्यंत दर 10 मिनिटांनी उपलब्ध आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये हडस हायस्कुल, धरमपेठ तारकुंडे महाविद्यालय, सरस्वती विद्यालय, सेवा सदन, मदन गोपाल, एलएडी कॉलेज, धरमपेठ सायन्स, भवन्स शाळा येथील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात मेट्रो सेवाचा उपयोग करीत आहे. महा मेट्रो अन्य शैक्षणिक संस्थान देखील आवाहन करत आहे कि, विद्यार्थ्यंना मेट्रोचा उपयोग करण्याकरिता प्रेरित करावे तसेच कुठलीही अडचण असल्यास मेट्रो प्रशासनाशी संपर्क साधावा.महा मेट्रोच्या वतीने नागपुरातील शाळा आणि कॉलेजमध्ये शिबिराच्या माध्यमाने उपक्रम राबवत जनजागृती केल्या जात आहे.
उल्लेखनीय आहे कि,शैक्षणिक सत्र 24 जून पासून सुरु झाल्यावर विद्यार्थ्यांची गरज बघता, नागपूर मेट्रोच्या खापरी,ऑटोमोटिव्ह चौक, प्रजापती नगर आणि लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन या चारही टर्मिनल स्टेशनवरून मेट्रो सेवा सकाळी 8 ते रात्री 8 वाजता दरम्यान दर 10 मिनिटांनी उपलब्ध केल्या आहेत. तसेच नागपूर मेट्रोने प्रवासी तिकीट संरचना केली आहे ज्यामध्ये मेट्रो ट्रेनच्या भाड्यात 33% पर्यंत कपात करण्यात आली आहे आणि विद्यार्थ्यांना महाकार्डवर मिळणाऱ्या 30% डिस्काउंट शिवाय नव्या संरचनेनुसार शालेय आणि महाविद्यालयातील विद्यार्थीकरता हे भाडे जवळपास 50% पर्यत कमी झाले आहे. प्रवासी तिकीट संरचनेमुळे नागपूर मेट्रोच्या प्रवासी संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे.
शहरात अलीकडच्या काळात रस्ते अपघात झाले आहेत, सुरक्षित आणि सुरक्षित प्रवासासाठी मेट्रोने प्रवास करण्याचे आवाहन महा मेट्रोच्या वतीने विद्यार्थ्यांना करण्यात येत आहे.त्यासोबतच मेट्रो ट्रेनमध्ये (कुठलेही अतिरिक्त भाडे न घेता) सायकल सोबत घेऊन जाण्याची परवानगी देते हि वस्तुस्थिती विद्यार्थ्यांना लास्ट माईल कनेक्टिव्हिटी देखील सुनिश्चित करते.
महा मेट्रोने नुकतेच व्हॉट्सऍप तिकीट सेवा सुरू केली आहे, ज्यामुळे केवळ प्रवासाचा वेळच वाचत नाही तर यामुळे तिकीट खरेदीसाठी रांगेत उभे राहण्याची गरज नाहीशी झाली आहे. नागपूर मेट्रो विद्यार्थी, शालेय प्राचार्य आणि त्यांच्या पालकांना आरामदायी आणि स्वस्त प्रवासाकरिता मेट्रोने प्रवास करण्याचे आवाहन करीत आहे.