संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- मागील काही वर्षांपासून कामठी नगर पालिकेला केंद्र शासनाकडून मिळणारा पंधराव्या वित्त आयोगाचा निधी न मिळल्याने शहरातील घनकचरा व्यवस्थापन,पाणी पुरवठा व पथदिव्याचे देयके अदा करण्यासाठी मोठी आर्थिक अडचण निर्माण झाली असून कामठी नगर पालिकेवर कर्जाचे डोंगर उभे झाले आहे.या पंधराव्या वित्त आयोगाच्या निधी अभावी शहरातील घनकचरा व्यवस्थापन कोलमडण्याच्या मार्गावर आहे तसेच शहरातील पथदिव्यांच्या विद्दूत पुरवठ्यासह पाणी पुरवठा योजनेच्या विजेची देयकेही कोटीच्या घरात गेल्याने हा खर्च नगर पालिकेच्या स्वनिधीतून करता करता नगर पालिका प्रशासनाला नाकीनऊ आले आहे.
पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून शहरातील घनकचरा व्यवस्थापन,पाणी पूरवठा व पथदिव्यासाठी लागणारे विजेची देयके दिली जातात .मात्र निधीचे अनुदान थकल्याने जवळपास महावितरण चे बिल पालिकेकडे थकले आहेत तसेच शहरात होणाऱ्या पाणी पूरवठ्याचे पंप चालविण्यासाठी लागणाऱ्या विजेच्या देयकाचे हीच अवस्था आहे.स्ट्रीट लाईट चे कोटी रुपये थकले आहेत .
कामठी नगर पालिकेला इतर मालमत्ता कर,जलकर,घरकर आदी कराच्या वसुलीच्या स्वनिधीतून जवळपास 5 कोटी रुपये प्राप्त होतात.सध्या या निधीतून थोडीफार देयके देऊन काम भागवले जात आहे.या स्वनिधीतून पालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन व कार्यालयाचे बिल दिले जातात.पालिकेतर्फे होणारी देखभाल दुरुस्ती साठी छोटी मोठी कामे या स्वनिधीतून होत असतात.आता ही सर्व कामे खोळंबत असून पालिकेने गरज असतानाही कंत्राटी कर्मचारी कमी केले आहेत.
लवकरच हा निधी मिळाला नाही तर शहरातील स्वच्छता व पाणी पुरवठ्याची व्यवस्था कोलमडेल यात काही शंका नाही अशी भीती व्यक्त होत आहे.
– शासनाचा हा पंधराव्या वित्त आयोगाचा निधी शहरासह ग्रामीण भागाला मिळतो .ग्राम विकास विभागातर्फे हा निधी ग्रामीण भागाला नियमितपणे वितरित केला जात आहे तर नगर विकास विभाग दस्तरखुद्द मुख्यमंत्र्याकडे असताना या विभागाकडून वित्त विभागाचा निधी वाटपास का विलंब होत आहे असा प्रश्न येथील जागरूक शहरवासी करीत आहेत.