जिल्ह्यातील डीईआयसी मुळे आता ऐकू व बोलू न शकणाऱ्या लहान बाळांमध्ये जन्मत: असलेला बहिरेपणा वेळेत लक्षात आल्यास त्यावर योग्य उपचार करून व्यंग दूर करणे शक्य

गडचिरोली :- सामान्यपणे मातेच्या गर्भातच बाळाला ऐकू येण अपेक्षित असत परंतु जर सुरवातीपासूनच बाळ कुठल्याही प्रतिक्रियेला, आवाजाला प्रतिसाद देत नसेल तर बाळांमध्ये जन्मतः असलेला बहिरेपणा वेळेत लक्षात आल्यास योग्य उपचार करून जन्मता असणारे व्यंग दूर करून नवं आयुष्य देता येण शक्य आहे.

जन्मापासूनच आपल्या पाल्य ऐकू व बोलू शकत नसल्याचे लक्षात आल्यावर संभ्रमात असलेले पालक डीईआयसी मध्ये आले असता प्रथमता डीईआयसीतील स्टाफ नर्स कु.शीतल देवावार बालकाचीअन्थ्रोपोमेट्री करूननोंदणी करतात व आजारानुसार कोणत्या विभागात मुल्यांकन लागेल या बद्दल माहिती देऊन डीईआयसीतील विविध विभागाबद्दल ओळख करुन त्या-त्या विभागात पाठविले जाते .

डीईआयसीतील सायकोलॉंजीस्ट उमेश कुळमेथे यांनी ४५ मिनिटे ते १ तास कालावधीची मानसशास्त्रीय मुल्यांकन करून बाळाचा मानसिक आरोग्य, आकलन शक्ती,वर्तन विषयक समस्या, श्रवणदोष,वाचादोष ई.बाबत पालकांना अवगत केले.

डीईआयसीतील ऑडियोलॉजीस्ट दिव्या गोस्वामी यांनी संपूर्ण बालकाचा जन्मतः इतिहास घेऊन कानाची तपासणी करून कोणत्या टेस्ट ची गरज आहे हे पालकांच्या लक्षात आणून देऊन श्रवण मुल्यांकन करिता काही मिनिटातच होणारी प्राथमिक ओएई टेस्ट तथा सुमारे १ तास ते १.३० कालावधीची बेरा टेस्ट करून बालकाची श्रवण क्षमता किती आहे याबद्दल पालकांना जाणीव केली जाते. व

संपूर्ण तपासणी अंती नाक-कान-घसा तज्ञडॉ.स्मिता साळवे यांनी बाळ जन्मजात कर्णबधीर असल्याबाबत निदान निश्चिती करतात,

सदर बालकाचे कॉक्लीयर इंम्प्लाट शल्यचिकित्सक नागपूर यांच्या उच्चस्तरीय विशेषज्ञ सल्लानुसार बाळ कॉक्लीयरइंम्प्लांट शस्त्रक्रियेकरिता पात्र असल्याबाबत निदान करण्यात आले.

त्यानुसार डीईआयसी चे सामाजिक कार्यकर्ता गोपाल पेंदाम यांनी पालकांना या शस्त्रक्रियेबाबत संपूर्ण माहिती, मार्गदर्शन, समुपदेशन, युडीआयडी करून नियमितपणे पाठपुरावा केले. व डीईआयसी व्यवस्थापक यांनी राज्य सामंजस्य करार असलेल्या रुग्णालयाशी समन्वय साधून वेळोवेळी उच्च स्तरीय शल्यचिकित्सक विशेषज्ञ सल्ला सेवा,गरजेनुसार उच्च स्तरीय विशेष चाचण्या जसे कि मेंदूचे एमआरआय, सिटी टेम्पोरल बोन, न्युमोकोकल वाक्सिनेषण व इतरप्रक्रिया चे सनियंत्रण करून डीईआयसी मार्फत शस्त्रक्रियेकरिता तृतीय स्तरावर संदर्भित करण्यात आले.

कॉक्लीयर इंम्प्लाट सर्जनडॉ.पी.नाईक वकान-नाक-घसा तज्ञचमूनेलसन्सचाईल्ड हॉस्पीटल नागपूर यांनी केवळ १८ महिन्याच्या धीरज साळवे रा सोनापूर कॉम्पलेक्स गडचिरोली या बालकाची यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया करण्यात आली.

शस्त्रक्रियेने कानाच्या मागील हाडामध्ये बसविलेली यंत्र काही दिवसातच सुरु केला जातो व बाळाला ऐकू येण्यास सुरुवात होते, पहिल्यांदाच बाळ ऐकू शकणार असल्याने, आवाजाला प्रतिसाद, उच्चार, बोल, भाषा, संकल्पना, हावभाव ई बाबत डीईआयसीतील ऑडियोलॉजीस्ट ह्या स्पिच थेरेपी सत्र नियोजित करून देतील. सोबतचडीईआयसीतील मानसशास्त्रज्ञ व विशेष शिक्षक बालकांसोबत विविध उपक्रमातून नव नवे अनुभवाची सांगळ, सामाजिक भावनिक कौशल्य, शब्दातून भावभावना व्यक्त करण्याची क्षमता, व त्यांची बुद्धिमत्ता विकसित करिता थेरेपी सत्र नियोजित करतील.

जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक प्रमोद खंडाते, अति जिल्हा शल्य चिकित्सक साळून्खे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निवासी वैद्यकीय अधिकारी धुर्वे , जिल्हा महिला व बाल रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक प्रशांत आखाडे, यांच्या नियोजनामध्ये डीईआयसी कार्यक्रमांतर्गत श्रवणदोष असलेल्या बालकांची संदर्भसेवा पूर्ण करण्यात आले.

मुख्य म्हणजे पालकांना या संपूर्ण सेवा मोफत मिळाल्या असल्याने पालक आनंदी आहेत. या प्रकारे जन्मजात कर्णबधीर असणाऱ्या (दिव्यांग) रुग्णांसाठी कॉक्लीयर इंम्प्लांट ही अवघड शस्त्रक्रिया वरदान ठरलेलीआहे मात्र जिल्ह्यात याबाबत अद्याप जनजागृती, पुरेशी माहिती नसल्याने या शस्त्रक्रियेचे प्रमाण कमी आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांचे विधानभवन येथे छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन

Thu Aug 1 , 2024
मुंबई :- राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी आज विधानभवन येथे भेट देऊन हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती असल्याने विधानभवनातील लोकमान्य टिळक यांच्या अर्धाकृती पुतळ्यास तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस राज्यपाल यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com