थकबाकीमुळे २ गाळ्यांना मनपा कर वसुली पथकाने ठोकले टाळे

चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून कर वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. वारंवार सूचना देऊनही कर न भरणाऱ्या आणि टाळाटाळ करणाऱ्या दुकानदारांचे गाळे सील करण्याची कारवाई सुरू आहे. १६ जानेवारी रोजी मनपाच्या कर वसुली व जप्ती पथकाद्वारे भिवापूर वॉर्डातील मनपा मालकीच्या सुपर मार्केट मधील २ गाळ्यांना सील करण्यात आले.      भिवापूर वार्ड येथील सुपर मार्केट मधील गाळा क्र. ८३०, गाळेधारक अब्दुल रफिक सत्तार शेख यांच्याकडे रुपये ६४२७३/- तर गाळा क्र. ८३८, गाळेधारक प्रशांत पंदीलवार तर्फे गणेश गोरडवार यांचेकडुन रुपये १,९२,६२९/- इतकी रक्कम भाडे स्वरूपात थकीत असल्याने तसेच मालमत्ता धारकाने कर भरणा करण्यासंदर्भात नकारात्मक प्रतिसाद दिल्याने कर वसुली व जप्ती पथकाने मालमत्ता धारकाचे दुकान सील केले. या दोन्ही गाळ्यांवर मालमत्ता कर व अन्य कर थकीत आहे.

सदर कारवाई मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात कर विभाग प्रमुख अनिल घुले यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात मालमत्ता कर पथकाने केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दक्षिण विभागीय विज्ञान प्रदर्शनी में अभिनंदन हाईस्कूल प्रथम विजेता

Mon Jan 16 , 2023
नागपुर :- हाल ही संपन्न 50 वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन में तहसील स्तर हुई विज्ञान, गणित और पर्यावरण प्रदर्शन दक्षिण विभाग द्वारा सुयश कॉन्वेंट वैभवनगर में आयोजन किया गया था. इस प्रदर्शनी में अभिनंदन कनिष्ठ महाविद्यालय बापुननगर का टेसला कॉइल मॉडल प्रथम विजेता रहा. यह मॉडल प्रा. राजेश मोहुर्ले, प्रा. धनश्री बारेकर के मार्गदर्शन में रजत जयस्वाल और मंथन रहांगडाले […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com