ट्रॅक्टर वरून नियंत्रण सुटल्याने चालकाचा मृत्यु

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत उत्तरेस दोन कि मी अंतरावरील शाहानी ट्रेडर्स जवळुन मृतक आपल्या ताब्यातील ट्रॅक्टरने पाण्याचे टँकर घेऊन कन्हान कडे जात असतांना ट्रॅक्टर वरून नियंत्रण सुटुन टँकटर पलटी झाल्याने चालकाचा कमरेला, पाठीच्या मनके ला व चेहऱ्याला मार लागुन रक्तस्राव झाल्याने चालक सचिन शिंदे चा घटनास्थळी मृत्यु झाल्याने कन्हान पोलीसांनी पोस्टे ला गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
प्राप्त माहिती नुसार ट्रॅक्टर क्रमांक एम एच ३१ /जी १३६२ चा चालक मृतक सचिन साहेबराव शिंदे, राह. संताजी नगर कांद्री कन्हान हा शनिवार (दि.२१) मे ला सकाळी ८ ते ८:१५ वाजता दरम्यान आपल्या ताब्यातील ट्रॅक्टर ने मागील बाजुस पाण्याचे टॅंकर घेऊन कांद्री कडुन कन्हान कडे जात असतांना वाहन भरधाव वेगाने व निष्काळजी पणाने चालवित अस ल्याने कांद्री बस स्टाप जवळ अचानक ट्रॅक्टर वरील नियंत्रण बिघडल्याने ट्रॅक्टर चे मागील बाजुस असलेले टॅंकर ट्रॅक्टर पासुन वेगळे होऊन महामार्गा च्या बाजु ला ट्रॅक्टर चे मुंडके पलटी झाल्याने त्यास कमरेला, पाठीच्या मनकेला व चेहऱ्याला जबर मार लागल्याने जागीच टँकटर चालक सचिन शिंदे चा मुत्यु झाल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी सरकार तर्फे पोलीस नापोशि यांच्या तक्रारी वरून कन्हान पोस्टे ला कलम २७९, ३०४ ए भादंवि मो वा कायदा १८४ अन्वये गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्ग दर्शनात कन्हान पोलीस करीत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

त्रिविध बुद्ध पोर्णिमा निमित्त बोधी पुजा परित्त देसना संम्पंन्न

Sun May 22 , 2022
संदीप कांबळे विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 22 :- अंतरराष्ट्रीय ख्यातीचे बौद्ध विद्वान बौद्ध प्रशिक्षण संस्थान बुद्धभुमी महाविहार कामठी रोड खैरी चे संस्थापक अध्यक्ष आल इंडिया भीक्खु संघ चै पुर्व संघानुशासक डॉ भदंत आनंद कौसल्यायन आणी संस्थापक सचिव आल इंडिया भीक्खु संघ ने पुर्व संघनायक डॉ भदंत सावंगी मेधनकर महास्थविर यांच्या श्रमसाफल्यातुन साकारलेल्या बुद्धभुमी महाविहार येथे दैदिस्यमान सोदर्यीकृत सुशोभीत विधृत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!