संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 9:-ड्रॅगन पॅलेस भुयार पुलिया मार्गावरून नागरिकांची रेलचेल निरंतर सुरू असते .या मार्गावरून तालुक्यातील ग्रामीण भाग तसेच नवीन कामठी परिसरात येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची रेलचेल ही कायम असते मात्र या ड्रॅगन पॅलेस भुयार पुलिया मार्गावर पडलेले खड्डे हे अपघातास निमंत्रक ठरत आहेत.या खड्ड्यामुळे जिवीतहानी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही तेव्हा हे खड्डे लवकरात लवकर बुजविण्यात यावे अशी मागणी जागरूक नागरिकांनी केली आहे.
ड्रॅगन पॅलेस भुयार पुलिया मार्गे दररोज विद्यार्थी वर्ग , मॉर्निंग वॉकिंग करणारे, ड्रॅगन पॅलेस ला जाणारे अनुयायी, नवीन कामठी भागातील नागरिक तसेच आजणी, गादा,गुमथळा यासारख्या ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी वर्ग आदींची ये जा हे नित्याचेच असते.आता पावसाळ्याचे दिवस असल्याने ड्रॅगन पॅलेस भुयार पुलिया मार्गावर पडलेल्या खड्ड्यात पाणी साचलेले असते . अशा वेळी खड्डा रस्त्यात की रस्त्यात खड्डा अशी स्थिती निर्माण झाली आहे.रात्रीच्या सुमारास वाहनधारक वाहन चालवीत असताना अपघात होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते.पावसाळ्यात सदर मार्ग हा जलमय होतो,त्यामुळे कित्येक लोकांचे किरकोळ अपघात झाले आहेत.त्यासाठी सदर रस्त्यावरील खड्डे लवकरात लवकर बुजविण्यात यावे अशी मागणी विद्यार्थी वर्ग, वाहतुकदार आदी जागरूक नागरिकांनी केले आहे.