संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- आगामी विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगामार्फत 1 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार आज दिनांक 6 ऑगस्ट 2024 रोजी 58-कामठी विधानसभा मतदार संघाची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. दरम्यान कामठी-मौदा विधानसभा अंतर्गत येणाऱ्या कामठी तालुका, मौदा तालुका ,तसेच नागपूर ग्रामीण क्षेत्रातील मतदारांचा समावेश आहे.ही प्रारूप मतदार यादी संबंधित बीएलओ कडे पडताळणी करिता उपलब्ध राहणार आहे.सर्वांनी ही प्रारूप मतदार यादी पडताळणी करून आपल्या नावाची खात्री करून घ्यावी. तसेच जाहीर प्रारूप मतदार यादीत नाव नसणे, नावात चूक असणे आदी संदर्भात 6 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट 2024 पर्यंत हरकती व दावे दाखल करता येणार आहे.
आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदार याद्यांचे पुनरीक्षण काम हाती घेण्यात आले होते.आज 6 ऑगसर ला .प्रारूप मतदार याद्या तयार करण्यात आल्या असून .या मतदार याद्यामधून दुबार असलेले नाव वगळणे,मृतक मतदारांची नावे गाळणे,नवीन मतदारांचा समावेश करणे आदी उपक्रम राबविण्यात आले व आज 6 ऑगस्ट ला प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे .
ज्या नागरिकांचे वय दिनांक 1 जुलै 2024 तसेच 1 ऑक्टोबर 2024 रोजी 18 वर्षे पूर्ण होतात त्यांना नमुना 6 द्वारे आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करता येणार आहे.तसेच 10 व 11 ऑगस्ट तसेच 17 व 18 ऑगस्ट रोजी विशेष मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार गणेश जगदाळे व निवडणूक नायब तहसीलदार मयूर चौधरी यांनी केले आहे.