संदीप कांबळे, कामठी
– जागतिक क्षयरोग दिन उत्साहात
कामठी ता प्र 24:-डॉ राबर्ट कॉक यांनी सन 1982 साली क्षयरोगाच्या जिवाणूंचा शोध लावला व त्याचा प्रबंध जागतिक शास्त्रज्ञानांच्या परिषदेत मांडला व त्याला 24 मार्च रोजी मान्यता मिळाली त्यामुळे दरवर्षी 24 मार्च हा दिवस जागतीक क्षयरोग दिन सर्वत्र साजरा करण्यात येतो त्यानुसार आज कामठी तालुक्यात क्षयरोग दिन साजरा करण्यात येत आहे तेव्हा क्षयमुक्त करण्यासाठी सर्वांनी संकल्प करावा असे मौलिक प्रतिपादन कामठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ संजय माने यांनी आयुष्यमान हॉस्पिटल येथे कामठी आयोजित जागतिक क्षयरोग दिन व मोफत रोग निदान शिबिर कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले. याप्रसंगी डॉ त्रिदीप गुहा, डॉ राजेश्री कापकर, डॉ प्रकाश घिरबाते, डॉ दुरवेंद्र वासनिक , शहाबुद्दीन शेख, कमलेश गजभिये, कविता शंभरकर, कपिल तरारे आदी प्रामुख्याने उपस्थित होते .
जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधून आयुष्यमान हॉस्पिटल येथे आज 24 मार्च ला कामठी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय व आयुष्यमान हॉस्पिटल कामठी च्या संयुक्त विद्यमाने मोफत क्षयरोग तपासणी व आरोग्य निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात शेकडो च्या वर नागरिकांनी मोफत रोग निदान शिबिराचा लाभ घेतला.
या मोफत रोग निदान व क्षयरोग तपासणी शिबिराचे उदघाटन तालुका आरोग्य अधिकारो डॉ संजय माने यांच्या शुभ हस्ते डॉ रॉबर्ट कॉक यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. याप्रसंगी उपस्थित डॉक्टरांनी जागतिक क्षयरोग दिनावर समयोचित असे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शासकोय उपजिल्हा रुग्णालयाचे क्षयरोग विभागाचे शहाबुद्दीन शेख, वरिष्ठ क्षयरोग पर्यवेक्षक कमलेश गजभिये, कविता शंभरकर,कपिल तरारे, आशा वर्कर गण तसेच आयुष्यमान रुग्णलयातील संदीप माहुरे, रोहन बोंद्रे, तब्बसुम आफ्रिन, आलिया परवीन, श्रेया हेलवटकर, संगीता पटले, मेघा बारसागडे, रूट मारबते, हेमा कनोजे,अर्पिता गडपायले, इशाणी दुरुगकर, शक्ती सुखदेवें, आशुतोष, भावना मंडपे आदींनी मोलाची भूमिका साकारली .
क्षयमुक्त करण्याचा सर्वांनी संकल्प करावा:-डॉ संजय माने
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com