नागपूर :- आंबेडकरवादी महिला संघ तसेच आंबेडकराईट वूमेन्स हेल्प ग्रुप तर्फे जागतिक महिला दिवस आणि महाड संगर दिवस संयुक्त कार्यक्रम डॉ आंबेडकर सांस्कृतिक भवन, बानाई येथे दिनांक ३० मार्च रोजी दुपारी १२ वाजता घेण्यात येणार आहे.
मागील वर्षांपासून कर्तृत्ववान जेष्ठ महिलेला ‘जीवनगौरव’ पुरस्कार देण्यात येत असतो. यावर्षी दुसरे वर्ष, यावर्षीच्या जीवनगौरव पुरस्काराच्या मानकरी आहेत डॉ. रूपा बोधी, त्यांच्या ४४ वर्षांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यांच्या शैक्षणिक, धार्मिक, सामाजिक, महिलांविषयी कार्य व असंघटित घरगुती मोलकरणींना संघटित करून त्यांच्या न्याय हक्क मिळवून देण्यासाठी केलेल्या कार्याला सन्मानित करण्यासाठी त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी जेष्ठ आंबेडकरवादी विचारवंत डॉ. धनराज डाहाट, डॉ दीप्ती किरतकर असणार आहेत तर अध्यक्षस्थानी आंबेडकरवादी महिला संघाच्या पूनम ढाले, महा. समता सैनिक दल संघटिका, आंबेडकरवादी विचारवंत असणार आहेत.
डॉ रूपा बोधी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे . त्यांच्या बरोबर समाजातील अन्य कर्तृत्ववान महिला डॉ शांता गवई, डॉ, प्रो, भुवनेश्वरी मेहरे, सुजाता लोखंडे यांचा सुद्धा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
आपण सर्वांनी उपरोक्त कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन आंबेडकरवादी महिला संघाच्या उज्वला गणवीर, सरिता सातरडे, करुणा मुन, प्रतिभा सहारे, जयश्री गणवीर, सविता धमगाये, प्रज्ञा मेश्राम, दीपाली चहांदे, सीमा थुल, सुमित्रा निकोसे, योगिता बन्सोड व आंबेडकरवादी महिला संघ व विमेन्स हेल्प ग्रुपचे सर्व सदस्य यांनी केले.