“डॉ. पंजाबराव देशमुख- सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती”मराठा, कुणबी विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत

Ø अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 30 जुलै

नागपूर :- छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे च्या वतीने मराठा-कुणबी लक्षित गटातील विद्यार्थ्यांकरिता “डॉ. पंजाबराव देशमुख- सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती” 2024-25 योजनेच्या लाभासाठी पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. 30 जुलै 2024 पर्यंत अर्ज स्विकारले जाणार आहेत.

राज्य शासनाने शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून मराठा-कुणबी समाजातील विद्यार्थ्यांकरिता “डॉ. पंजाबराव देशमुख- सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती” लागू केली आहे. या योजनेंतर्गत देशातील नामांकित 200 शैक्षणिक संस्थांमध्ये वर्ष 2024-25 प्रवेशाकरिता मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या लक्षित गटातील विद्यार्थ्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेसंदर्भातील विस्तृत माहिती सारथीच्या https://sarthi-maharashtragov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून जास्तीत-जास्त लक्षित गटातील विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सारथी नागपूरचे उपव्यवस्थापकीय संचालक तथा उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

उद्योग आस्थापनांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी - जिल्हाधिकारी

Fri Jul 19 , 2024
गडचिरोली :- राज्यात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना नुकतीच जाहीर झाली आहे. या योजनेंतर्गत शासनामार्फत शैक्षणिक अर्हता 12 वी पास करीता प्रतिमाह विद्यावेतन 6 हजार रुपये, आय.टी.आय/पदविकाधारकास प्रतिमहा 8 हजार रुपये तर पदवीधर/पदव्युत्तर उमेदवारास प्रतिमहा 10 हजार याप्रमाणे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात दरमहा विद्यावेतन जमा करण्यात येईल. शासनाने दिलेल्या विद्यावेतनाव्यतीरिक्त प्रशिक्षणार्थ्यांना विद्यावेतन देण्याची मुभा आस्थापना व उद्योगांना राहणार आहे. त्यामुळे या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com