डॉ प्रशांत बोकारे यांची गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती

नागपुर – डॉ प्रशांत श्रीधर बोकारे यांची गडचिरोली येथील गोंडवना विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी सध्या ओ.पी.जिंदाल विद्यापीठरायगडछत्तीसगड येथील स्कुल ऑफ इंजिनीअरिंग येथे प्राध्यापक व अधिष्ठाता असलेल्या डॉ प्रशांत बोकारे यांच्या नियुक्तीची घोषणा केली.   डॉ प्रशांत बोकारे यांची नियुक्ती पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी करण्यात आली आहे.

दिनांक  ७ सप्टेंबर २०२० रोजी गोंडवना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ नामदेव कल्याणकर यांचा कार्यकाळ संपल्यापासून हे पद रिक्त होते. रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. श्रीनिवास वरखेडी यांचेकडे सदर पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता.

डॉ प्रशांत बोकारे यांनी सांगली येथील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय सांगली येथून स्थापत्य अभियांत्रिकी ही पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी नागपूर येथील व्हीआरसीई येथून एम. ई. ही पदव्युत्तर पदवी प्राप्त केली व आयआयटी  गुवाहाटी येथून पीएच.डी. प्राप्त केली. त्यांना अध्यापन व संशोधनाचा व्यापक अनुभव आहे.

डॉ बोकारे यांनी बापूराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालय सेवाग्राम वर्धा येथे तसेच रुंगटा अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय येथे प्राध्यापक व प्राचार्य पदावर काम केले आहे. 

कुलगुरू निवडीसाठी राज्यपालांनी अलाहाबाद उच्च न्यायालय येथील सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीश न्या. दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिति गठित केली होती. इंडियन इंस्टीट्युट ऑफ मॅनेजमेंट इंदोर येथील संचालक प्रा. हिमांशू राय व शासनाचे प्रधान सचिव ओमप्रकाश गुप्ता या समितीचे सदस्य होते. 

समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉ प्रशांत बोकारे यांची कुलगुरूपदी नियुक्ती जाहीर केली.  

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान

Thu Dec 9 , 2021
नागपूर  :  महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदार संघ निवडणुकीसाठी शुक्रवार 10 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. जिल्हा निवडणूक यंत्रणा यासाठी सज्ज झाली आहे.        जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विमला आर. यांनी आज निवडणूक यंत्रणेचा आढावा घेतला. मतदान प्रक्रिया व त्यानंतरच्या व्यवस्थेबाबत उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी त्यांनी बैठक घेऊन चर्चा केली. बचत भवन येथे मतमोजणी होणार आहे. त्यामुळे मतदान पेट्या बचत भवन येथील स्टॉगरूम […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com