डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील अतिक्रमण काढा भाजपचे मुख्याधिकाऱ्याना निवेदन

संदीप कांबळे, कामठी
कामठी प्रतिनिधी १२ एप्रिल – जयस्तभ चौकातील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील अतिक्रमण काढून विशेष स्वच्छता अभियान राबवून पुतळा परिसरात विद्यूत रोषणाई करण्यात यावी अश्या मागणीचे निवेदन भाजपा कामठी शहर अनुसूचित जाती आघाडीच्या वतीने मुख्याधिकारी नितीन चव्हाण यांना आज दुपारी देण्यात आले
कोरोना नंतर साजरी होत असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर जंयती निमित्ताने आंबेडकरी समाजात नव चैतन्य संचारले असून जयंती समारोहाला गालबोट लागू नये म्हणून प्रशासनाने दक्षता घ्यावी असे आवाहन भाजपा अनुसूचित जाती आघाडी कामठी शहर अध्यक्ष विक्की बोंबले, भाजपा कामठी शहर अध्यक्ष संजय कनोजिया केले.
यावेळी भाजपा पदाधिकारी लाला खंडेलवाल,उज्वल रायबोले, राजकुमार हाडोती,जितेंद्र खोब्रागडे,बिरजू चहांदे,महेंद्र वंजारी,लालसिंग यादव,बादल कठाणे,अवि गायकवाड,निशांत यादव,प्रज्ज्वल सोलंकी,बादल नारायणे,विरेंद्र राऊत,विरेंद्र चव्हाण,संजय देशभ्रतार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

विद्यार्थ्यांमध्ये रोजगार निर्मिती व प्रशासनामधील भ्रष्टाचार विरूद्ध बरीएम लढा देणार-ऍड सुलेखाताई कुंभारे

Tue Apr 12 , 2022
संदीप कांबळे,कामठी -बरीएम च्या स्थापना दिनी बहुजन-रिपब्लिकन नेते एकवटले कामठी ता प्र 12:-भ्रष्टाचार मुक्त प्रशासनाकरिता लढा देणार, बेरोजगारी दूर करण्याकरिता रिफायनरी प्रकल्प विदर्भात आणण्याकरिता पुढाकार करणार, बहुजन समाजाच्या शैक्षणिक व राजकीय आरक्षणाच्या मागणिला गतिमान करणार,महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्याकरिता केंद्र शासनास पाठपुरावा करणार इत्यादी महत्वपूर्ण ठराव बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या 16 व्या वर्धापन दिनानिमित्त […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!