परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दहा दिवसीय समता सप्ताहाचे आयोजन

संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 8:-सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त सहा एप्रिल ते 16 एप्रिल दोन हजार बावीस रोजी समता सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या अनुषंगाने सफाई कामगारांच्या मुला मुलींची शासकीय निवासी शाळा रमा नगर नागपूर येथील विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित विविध स्पर्धेमध्ये भाग घेतला यामध्ये प्रश्नमंजुषा भीम गीते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार चित्रकला आयोजित करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी या मध्ये भाग घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले आहे याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना प्राप्त झाले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

11 एप्रिल ला बहुजन रिपब्लिकन एकता मंच चा 16 वा स्थापना दिन

Fri Apr 8 , 2022
संदीप कांबळे,कामठी – बरीएम स्थापना दिन समारंभाचे उदघाटन श्रीमंत राजे भोसले करतील –बहुजन रिपब्लिकन एकता मंच च्या कार्यकर्त्यामध्ये प्रचंड उत्साह कामठी ता प्र 8:-रिपब्लिकन विचारांच्या लोकांना तसेच अल्पसंख्याक , मागासवर्गीय, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, असंघटित कामगार , भटक्या विमुक्त जाती , महिला आणि सर्व शोषित समूहाला संघटित करून त्यांच्या शैक्षणिक , सामाजिक , आर्थिक , सांस्कृतिक व राजकीय न्याय हक्काच्या उद्दिष्टांची […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com