नागपूर :- सामाजिक जीवनात केलेले विविध कल्याणकारी कार्य व तळागाळातील समाजाच्या सर्वांगीण विकासात केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागातर्फे आज 12 मार्च ला मुंबई येथील रास्टिय आर्ट सेंटर मरीन ड्राइव्ह येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि उपमुख्य मंत्री अजित पवार यांचे शुभ हस्ते नागपूरचे सामाजिक कार्यकर्ते अशोक कोल्हटकर यांना राज्य शासनाचा मनाचा डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोल्हटकर यांचा शाल, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र आणि 15 हजार रू रोख देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना मुख्यमंत्री आणि उपमुख्य मंत्री म्हणाले या प्रतिष्ठेच्या सन्मानाच्या माध्यमातून उतुंग शिखर गाठावे, आपले ज्ञान कौशल्य व अनुभवाचा समाजाच्या व शहराच्या व देशाच्या सर्वांगीण विकासासाठी होईल ही सदिच्छा देऊन अभिनंदन केले.
याप्रसंगी क्रीडा युवा कल्याण मंत्री संजय बनसोडे, आमदार किशोर जोरगेवार, आमदार भरत गोगावले, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव सुमंत भांगे, समाजकल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरिया आदी उपस्थित होते.