डॉ.ॲड.अंजली साळवे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती

नागपूर :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश सरचिटणीस या पदावर डॉ. ॲड. अंजली साळवे विटनकर यांची नियुक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली असून त्यांचे नियुक्ति पत्र राज्याचे माजी गृहमंत्री आ. अनिल देशमुख यांच्या हस्ते देण्यात आले.

केंद्र सरकार ने 2019 ला जाहीर केलेल्या जनगणना कार्यक्रमावर 2019 ला राज्यात सर्वप्रथम आक्षेप घेत 2021 च्या जनगणना कार्यक्रमात ओबीसीची गणना व्हावी यासाठी पाटी लावा अभियान सुरू करून डॉ ऍड साळवे यांनी राज्यात ओबीसी जनगणना जागृती लढा घराघरात पोहचविला. ओबीसी जनगणना ठराव पारित करा व केंद्राकडे रेटून धरा आणि केंद्र जर ओबीसी गणना करत नसेल तर ती राज्याने करावी ही ऐतिहासिक मागणी करत ओबीसी गणना विषय विधिमंडळासोबतच दिल्ली येथील जंतर मंतर आणि संसदेत दिवंगत खासदार बाळू धानोरकर, दिवंगत खासदार राजीव सातव, खासदार अमोल कोल्हे याचे मार्फत पोहोचविला सोबतच सर्वोच्च न्यायालयात देखील लढा सुरू केला.

व्यवसायाने समुपदेशक व कायदेविषयक सल्लागार असलेल्या डॉ. ॲड. अंजली साळवे विटनकर या मूळच्या चंद्रपूर जिल्ह्यातील आहे. सामाजिक क्षेत्रात तब्बल 25 वर्षांपासून कार्यरत सोबतच राष्ट्रीय व राज्य पातळीवर राष्ट्रीय महिला आयोग, नवी दिल्ली, नॅशनल लेव्हल मॉनिटर (संस्थात्मक नॅशनल लेव्हल मॉनिटर), सामाजिक तज्ञ, केन्द्रीय ग्राम विकास मंत्रालय, भारत सरकार, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ माईनर्स हेल्थ (केन्द्रीय खाण मंत्रालय) ची इथिकल समिती सदस्य (अशासकीय), बाल कल्याण समिती, नागपूर (महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र शासन) शिवाय वैयक्तिक, सरकारी व गैरसरकारी संघटनांच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्र, प्रशासकीय, व्यवस्थापन, शैक्षणिक, धोरणात्मक, प्रशिक्षक, संशोधन, विषयतज्ञ म्हणून कार्यरत असुन महिला व बाल धोरण, महिला व बालकाचे कायदे, शेतकरी, विद्यार्थी, कामगार, भारतीय संविधानिक अधिकार, सरकारी योजना,ओबीसी प्रश्न, ग्रामिण जीवन आणि समस्या या क्षेत्रात त्यांचा अभ्यास व प्रत्यक्ष कामाचा दांडगा अनुभव आहे.

बालकांचे व महिलांचे प्रश्न, पीडित महिलांसाठी लढा, कामगार, शेतकरी, विद्यार्थी व अनाथ बालकांच्या प्रश्नाची विविध स्तरावरुन सोडवीत आहेत. अंजली साळवे यांच्या कार्याची दखल घेत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार यांच्या संमतीने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांची पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस या पदावर त्यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या या नियुक्तीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, माजी गृहमंत्री आ. अनिल देशमुख, प्रदेश राष्ट्रवादी महिला अध्यक्ष ऍड रोहिणी खडसे, प्रदेश युवती अध्यक्षा सक्षणा सलगर, प्रदेश युवक अध्यक्ष मेहबूब शेख ,प्रदेश ओबीसी सेल अध्यक्ष राजा राजापूरकर, युवा नेते सलील देशमुख, राष्ट्रवादी ग्राहक सेलचे प्रदेशाध्यक्ष सूर्यकांत गवळी, प्रदेश सरचिटणीस मुनाझ शेख, प्रवीण कुंटे, हिराचंद बोरकुटे, प्रदेश संघटक सचिव डी. के आरीकर, सोशल मीडिया फ्रंट सेल मनीषा भोसले, प्रवक्त्या ऍड हेमा पिंगळे, नागपूर व चंद्रपूर जिल्ह्याचे ग्रामीण व शहर जिल्हाध्यक्ष राजू राऊत, दूनेश्वर पेठे, राजेंद्र वैद्य,दिपक जैस्वाल, मेहमूद मुसा, बल्लारशा शहर अध्यक्ष बादल उराडे, ऍड वैशाली टोंगे यांनी स्वागत केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कोराडी मे नगर प्रभात फेरी के साथ संगीतमय शिव महापुराण कथा का समापन 

Sat Dec 2 , 2023
कोराडी :- नागपुर के श्रीक्षेत्र महालक्ष्मी जगदंबा की नगरी नई कोराडी विट्ठल रुक्मणी मंदिर के सामने स्थित त्यागी बाबा राजाराम परनामी निवास पर संगीतमय शिव महापुराण कथा का गुरुवार 30 नबंवर को नगर प्रभात फेरी के साथ समापन हुआ। प्रवचनकार हरि भक्त पारायण टेकेस्वरानन्द महाराज आलंदीकर ने अपनी अमृतवाणियों से शिवपुराण कथा को संबोधित करते हुए कहा कि जो भूतनाथ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!