डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्रासाठी 575 कोटींच्या निधीस प्रशासकीय मान्यता

नागपूर :- इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी संलग्न असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्रामध्ये नवीन पदव्युत्तर व अतिविशेषोपचार अभ्यासक्रम व 615 खाटांचे रुग्णालय सुरू करण्यासाठी 575 कोटी 79 लक्ष 17 हजार 497 रुपयांच्या निधीस राज्यशासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे.

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागातर्फे दिनांक 5 डिसेंबर 2023 रोजी प्रशासकीय मान्यतेचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्राचे प्रस्तावित काम नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत करण्यासही शासनाने मान्यता दिली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मराठी भाषा विद्यापीठासाठी भूमी अधिग्रहणास वेग द्यावा - उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

Fri Dec 8 , 2023
– रिद्धपूर येथील मराठी भाषा विद्यापीठाबाबत आढावा बैठक नागपूर :-  अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे उभारण्यात येणार्‍या मराठी भाषा विद्यापीठासाठी भूमी अधिग्रहणाच्या कार्यवाहीला वेग द्यावा, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे आज येथे दिले. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्था (मॉरिस कॉलेज) येथे आढावा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!