डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधांच्या विक्रीविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश – राजेंद्र पाटील यड्रावकर  

 मुंबई : औरंगाबाद शहरातील औषध विक्री दुकानात डॉक्टरांच्या चिकित्सा चिठ्ठीशिवाय गोळ्यांची विक्री होत असल्याबाबत प्रसार माध्यमांमध्ये प्रसारित होत असलेल्या बातम्यांची गंभीर दखल घेतली असूनत्याविरुध्द कडक कारवाई करण्याचे आदेश प्रशासनास दिले आहेतअसे अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सांगितले.

            राज्यमंत्री यड्रावकर म्हणालेकाही व्यक्तींकडून नशेसाठी  Nitrosun (Nitrazepam Tablet) या झोपेच्या गोळ्यांची तसेच इतर औषधांची डॉक्टरांच्या चिकित्सा चिठ्ठीशिवाय खरेदी होत असल्याचे औरंगाबाद शहरात निदर्शनास आले होते. त्याअनुषंगाने सह आयुक्त (औषधे)औरंगाबाद विभाग यांना संबंधितावर कडक कारवाईचे आदेश दिले असून प्रशासनाने औषध विक्री दुकानांची तपासणी मोहिम राबवून ज्या ठिकाणी असे प्रकार आढळून येतील त्यांचे परवाने कायमस्वरुपी रद्द करावे. तसेच पोलीस प्रशासनाशी समन्वय साधून कडक कारवाई करण्याच्या सूचनाही राज्यमंत्री  यड्रावकर यांनी दिल्या आहेत.

            अन्न व औषध प्रशासन विभागाकडून औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 व नियम 1945 हा कायदा राबविला जातो. सदर कायद्यामधील तरतुदीनुसार डॉक्टरांच्या चिकित्सा चिठ्ठीशिवाय वर्गीकृत औषधांची विक्री करणे गुन्हा आहे.अशी विक्री केल्याचे आढळून आल्यास संबंधित आस्थापनेचे परवाने कायमस्वरुपी रद्द होऊ शकतात. तसेच त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल होऊ शकतात. औरंगाबाद विभागात एप्रिल2021 पासून मार्च 2022 पर्यंत एकूण सात प्रकरणात विना परवाना झोपेच्या गोळ्या/औषधे बाळगणे व विक्री करणे याकरिता पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेतअशी माहिती राज्यमंत्री यड्रावकर यांनी यावेळी दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

मुंबई शहर जिल्ह्याच्या महिला व बालविकास विभागास बाल न्याय निधी उपलब्ध

Thu Mar 31 , 2022
मुंबई : सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल संकिर्ण प्रकरणात देण्यात आलेल्या आदेशान्वये सर्वोच्च न्यायालयाने महिला व बाल विकास  विभागास बाल न्याय निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. मुंबई शहर जिल्ह्याकरिता बाल न्याय निधी आयुक्त, महिला व बाल विकास पुणे यांनी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हाकृती दल, मुंबई शहर यांच्या खात्यात हा निधी जमा केलेला आहे. या रकमेचा विनियोग कोविड 19 मुळे एक पालक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या 03 […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com