कार्यालय सुधारणा विशेष मोहिमेंतर्गत चांगले काम करा – जिल्हाधिकारी विकास मीना

– मोहिमेचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

यवतमाळ :- राज्य शासनाच्यावतीने 100 दिवसांची कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. मोहिमेंतर्गत नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधांसह कार्यालयीन सेवांची सुधारणा होणार आहे. जिल्ह्यात सर्व विभागांनी ही मोहिम उत्तमपणे राबवावी. मोहिमेंतर्गत झालेली कामे कायमस्वरुपी उपयोगी पडेल, अशा स्वरुपाची असावी, अशा सूचना जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केल्या.

सुधारणा मोहिमेंतर्गत राबवावयाच्या उपक्रमांचा राज्यस्तरावरून आढावा घेण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मोहिमेचे महत्व व करावयाच्या कामांची माहिती दिली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, सहाय्यक जिल्हाधिकारी लघिमा तिवारी, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत उंबरकर यांच्यासह सर्व विभागप्रमुख अधिकारी उपस्थित होते.

राज्यस्तरावरून मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी यांनी मोहिमेंतर्गत करावयाची कामे, उत्कृष्ट कामांसाठी कार्यालयांची निवड याबाबत राज्यातील सर्व विभाग, जिल्हा व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. दुसऱ्या टप्प्यातील ही मोहिम मे महिनाअखेरपर्यंत राबविण्यात येणार आहे. या कालावधीत शासकीय कार्यालयांनी संकेतस्थळांवर सुविधांची उपलब्धता, सुकर जीवनमान, स्वच्छता, तक्रार निवारण, कार्यालयीन सोई-सुविधा, क्षेत्रीय कार्यालयांना भेटी, ई-ऑफिस प्रणालीचा अवलंब, गुंतवणुकीस प्रोत्साहन, कार्यालयीन सुधारणा, नाविन्यपुर्ण उपक्रम राबवावयाचे आहे.

या प्रत्येक उपक्रमाचे गुणांकन केले जाणार असून यात उत्कृष्ट काम करणाऱ्या कार्यालयांना जिल्हा, विभाग व राज्यस्तरासाठी निवडून गौरव केला जाणार आहे. मोहिमेंतर्गत काम करतांना नागरिकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा कशा देता येतील, यावर भर देण्यात यावा. कार्यालयांनी केलेल्या कामांचे क्रॅास व्हेरीफिकेशन केले जाणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त चांगले काम या कालावधीत केले जावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

दि.2 मे रोजी कार्यालयांचे विभागस्तरावर सादरीकरण होणार आहे. यातून निवडलेल्या कार्यालयांचे सादरीकरण राज्यस्तरावर होतील. या कार्यालयांची तपासणी राष्ट्रीय गुणवत्ता संस्थेकडून केली जाणार आहे. त्यामुळे विभागप्रमुख अधिकाऱ्यांनी स्वत: पुढाकार घेऊन आपल्या व आपल्या अधिनस्त तालुकास्तरीय कार्यालयात उत्तमोत्तम काम करावे, अशा सूचना देखील जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केल्या.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

जिल्ह्यातील 570 ज्येष्ठ भाविक विशेष ट्रेनने अयोध्येला रवाना

Sat Mar 15 , 2025
Ø मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेंतर्गत पहिली ट्रीप Ø धामनगाव रेल्वे स्थानकावर भाविकांना शुभेच्छा यवतमाळ :- मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेंतर्गत जिल्ह्यातील भाविकांची पहिली ट्रीप धामनगाव रेल्वे स्थानकावरून विशेष ट्रेनने अयोध्येकडे रवाना झाली. अयोध्येसाठी 742 भाविकांनी नोंद केली होती. त्यापैकी 570 भाविक आज रवाना झाले. राज्य शासनाच्यावतीने भारतीय रेल्वेद्वारे भाविकांची प्रवास, निवास व भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. धामनगाव रेल्वे स्टेशन येथे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!