कन्हान शहरात व ग्रामिण भागात दिवाळी उत्साहाने थाटात साजरी

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

शिवाजी नगर येथे युवकांनी केले १०७ दिवे प्रज्वलित. 

कन्हान :- देशातील सर्वात मोठा सण दिवाळी उत्सव गेल्या दोन वर्षांपासुन कोरोना महामारीमुळे नागरिकांना उत्साहात साजरा करता आला नाही. मात्र या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात असल्याने शासनाने निर्बंध हटविल्याने शहरात व ग्रामिण भागात दिवाळी उत्साहातने थाटात साजरी करण्यात आली. दिवाळी उत्सवानिमित्त नागरिकांनी नवीन कपडे, फटाके व इतर वस्तुंची जोरदार खरेदी केली. दिवाळी लक्ष्मीपुजन च्या दिवशी नागरिकांनी आपल्या घरोघरी लक्ष्मी मातेची विधिवत पुजा अर्चना करून फटाके फोडुन आनंद उत्सव साजरा करण्यात आला.

शहरात दिवाळी निमित्त मंदिरां मध्ये भाविकांची मोठी गर्दी होती. या दिवाळी उत्सव निमित्त शिवाजी नगर कन्हान येथे शिवाजी स्मारक समोर कन्हान शहर विकास मंच सदस्य अनुराग महल्ले, कृणाल राजपुत, अनिल ठाकरे , हरिष तिडके आदी सह महिलांनी १०७ दिवे प्रज्वलि त करून भाविकांनी दिवाळी निमित्त पूजा केली.त्याच वेळी दिव्यांच्या रोषणाईने शिवाजी नगर परिसर उज ळुन निघाले आणि हे दृश्य आकर्षणाचे केंद्र ठरले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

NCC HONOURS VEER NARIS AT KATOL

Sat Oct 29 , 2022
 Katol :- Colonel Amod Chandna, Commanding Officer, Cadets and ANOs 20 Maharashtra Battalion NCC Nagpur felicitated two Veer Naris at Nabhira College Katol on 28 Oct 22. Meera, mother of Shaheed Naik Bhushan Ramesh Satai of 6 MLI, along with her son  Lekhandas and daughter  Sarita and Dr. Archana, wife of Shaheed Naik Ratnakar Rama Kalambe of 7 MLI was […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com