नागपूर :- प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी होणारा लोकशाही दिन सोमवार 11 सप्टेंबर 2023 रोजी विभागीय आयुक्त कार्यालय येथे सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे.
विभागाशी संबंधित असलेल्या प्रलंबित तक्रारीचा निपटरा तसेच जिल्हास्तरावरील लोकशाही दिनात दिलेल्या निवेदनाची प्रत, टोकनची प्रत तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या उत्तराची प्रतीसह विभागीय लोकशाही दिनास माहितीसह उपस्थित राहावे, असे उपायुक्त (सामान्य) प्रदीप कुलकर्णी यांनी प्रसिद्धी प्रकाव्दारे कळविले आहे.