विभागीय चाचा नेहरु बाल महोत्सवाचा समारोप

नागपूर : 1 ते 3 फेब्रुवारीदरम्यान नागपूर विभागातील महिला व बाल विकास विभागांतर्गत असलेल्या बालगृहातील मुलांच्या सुप्तगुणांना चालना मिळण्याकरीता विभागीय चाचा नेहरु बालमहोत्सवाचे आयोजन ग्रामीण पोलीस मुख्यालय येथे करण्यात आले होते. या महोत्सवाचा समारोपीय व बक्षिस वितरण कार्यक्रम प्रधान महालेखाकार प्रविरकुमार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. प्रमुख अतिथी पोलीस उपअधिक्षक (गृह) संजय पुरंदरे, पिठासीन अधिकारी तथा बाल न्याय मंडळाच्या अध्यक्ष सविता माळी आणि महिला व बालविकास विभागाच्या विभागीय उपायुक्त अपर्णा कोल्हे उपस्थित होते. दोन दिवस घेण्यात आलेल्या विविध स्पर्धाच्या विजेत्यांना मान्यवारांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.

महोत्सवात नागपूर, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया व गडचिरोली जिल्हयातील शासकीय व स्वयंसेवी बालगृहातील पुर्नवसनाकरीता दाखल झालेल्या अनाथ, निराधार, उन्मार्गी बालकांचा समावेश होता. एकमेकाविषयी बंधुभाव निर्माण व्हावा, हा महोत्सवाचा उद्देश होता.

1 फेब्रुवारीला सांस्कृतीक कार्यक्रमाने महोत्सवास सुरुवात झाली. 2 फेब्रुवारीला मैदानी खेळाला सुरवात होऊन कबडडी, खो-खो, व्हॉलीबॉल, शंभर मीटर धावणे, दोनशे र्मीटर धावणे, लंगडी, लांब उडी, उंच ऊंच उडी आदी मैदानी खेळ घेण्यात आले. सायंकाळी 6 वाजता अमोल एदलाबादकर यांचा हास्य विनोदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 3 फेब्रुवारीला समारोपीय व बक्षिस वितरण कार्यक्रमात प्रशांत भावसार यांचे जादूचे प्रकार हा कार्यक्रम घेण्यात आला.

तीन दिवसीय चाचा नेहरु बाल महोत्सवामध्ये नागपूर विभागातील बालकांनी मनसोक्त आनंद लुटला.

महोत्सवात450 बालके व 115 कर्मचारी सहभागी होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता इखार यांनी केले तर आभार प्रदर्शन चंद्रपुरचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दिपक बानाईत यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशांत व्यवहारे व सवई यांनी परिश्रम घेतले. राष्ट्रगीताने बाल महोत्सवाची सांगता करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

१९ वी नॅशनल इंक्लुझन कप २०२३ छत्तीसगड की टीम ने जीता खिताब 

Sat Feb 4 , 2023
विदर्भ की टीम उपविजेता, आंध्र प्रदेश की टीम तीसरे नागपुर: छत्तीसगढ़ ने खेल विकास संस्था( स्लम सॉकर) द्वारा आयोजित 19वां राष्ट्रीय इंक्लुझन कप २०२३ गर्ल्स स्लम सॉकर फुटबॉल टूर्नामेंट के फाइनल में मेजबान विदर्भ को 8-3 से हराकर खिताब जीत लिया. आंध्र प्रदेश ने महाराष्ट्र की टीम को 2-1 से हराकर तीसरा स्थान हासिल किया स्लम सॉकर एकेडमी बोखारा में […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com