नागपूर : राज्याचे ऊर्जा मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली बचत भवन येथे सोमवारी 20 डिसेंबर रोजी बारा वाजता जिल्हा नियोजन समिती वरील कार्यकारी समितीची आढावा बैठक होत आहे.
या बैठकीमध्ये 22 ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या कार्यकारी समितीच्या सभेचे इतिवृत्त, त्याचा अनुपालन अहवाल, जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना, अंतर्गत 2021 -22 अंतर्गत कोविडसाठी झालेल्या खर्चाचा आढावा तसेच कोविड प्रतिबंधात्मक उपाय योजनांकरिता पुनर्विलोकन प्रस्तावास मान्यता प्रदान करणे, जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अनुसूचित जाती उपयोजना आदिवासी कार्यक्रम २०२२-२३ प्रारुप आराखड्यास मान्यता प्रदान करणे, आदी विषयांवर चर्चा होणार असल्याचे जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गायकवाड यांनी कळविले आहे.