चंद्रपूर येथे जिल्हा स्तरीय टग ऑफ वार ( रस्सीखेच ) निवड चाचणी सम्पन्न – 2023

चंद्रपूर :- टग ऑफ वार असोसिएशन चंद्रपूर जिल्ह्याच्या वतीने चंद्रपूर येथे जिल्हा स्तरीय सब ज्युनियर, ज्युनियर, ज्युनियर मिक्स, सिनियर व सिनियर मिक्स ( मुले व मुली ) टग ऑफ वार निवड चाचणी दिनांक २७ ऑगस्ट २०२३ रोजी ठीक सकाळी ११:०० वाजता सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूरच्या मैदानावर घेण्यात आली होती. या निवड चाचणीच्या उदघाटन प्रसंगी उद्घाटक म्हणुन प्रा. डॉ. विजय सोमकुंवर संचालक, शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग प्रमुख सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर व निवड चाचणीचे अध्यक्ष प्रा. डॉ. अनीस अहमद खान संचालक, शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग प्रमुख महात्मा गांधी सायन्स कॉलेज, गड़चांदुर व टग ऑफ वार असोसिएशन, चंद्रपूर जिल्ह्याचे सचिव प्रा. विक्की तुळशीराम पेटकर हे उपस्थित होते. सदर टग ऑफ वार निवड चाचणीमधे मोठ्या संख्येने खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. सदर जिल्हा स्तरीय निवड चाचणीमधे प्रास्ताविक करताना प्रा. विक्की तुळशीराम पेटकर यांनी टग ऑफ वार या खेळाबाबत संपूर्ण माहिती सर्व खेळाडुंना समजावून सांगितली व निवड चाचणीच्या उदघाटन प्रसंगी उद्घाटक म्हणुन प्रा. डॉ. विजय सोमकुंवर यांनी खेळाडुंना खेळाबद्दलचे महत्व समजावून सांगितले तसेच अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. अनीस अहमद खान यांनी खेळ व खेळाडूवृती याबाबत भाषण केलेत्या नंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते टग ऑफ वार मैदानाचे पूजन करून सर्व खेळाडुंना शुभेच्या देऊन निवड चाचणीला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर निवड समितिद्वारे निवड चाचणीसाठी आलेल्या सर्व टग ऑफ वार खेळाडूंचे निवड चाचणी घेण्यात आली व निवड झालेला संघ कै. विश्वनाथराव नगळे हायस्कूल लोहा जिल्हा नांदेड येथे दिनांक ०८ ते १० सप्टेंबर २०२३ रोजी २४ वी सब ज्युनियर, ज्युनियर, ज्युनियर मिक्स, सिनियर व सिनियर मिक्स टग ऑफ वार राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.

या सदर निवड चाचणीत टग ऑफ वार असोसिएशन चंद्रपूरचे सहसचिव बंडू महादेव डोहे, कोषाध्यक्ष सौ. वर्षा घटे, हर्षल क्षिरसागर, सौरभ बोरकर, इखलाख पठान, रिंकेश ठाकरे, आदित्य आंबटकर, ईश्वर पोटर्ला, राकेश ठावरी, बल्लारपुर तालुका प्रतिनिधित्व भास्कर मुळे, रुचिता आंबेकर, श्रुती घटे, भाग्यश्री मेश्राम हे उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्यातील दुष्काळग्रस्त भागांना पाणी पुरविणाऱ्या प्रकल्पांना केंद्राने मदत करावी, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

Mon Aug 28 , 2023
– गांधीनगर येथील पश्चिम क्षेत्रिय परिषदेच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गांधीनगर :- दुष्काळग्रस्त मराठवाड्यात पाण्याची समस्या आहे. नदी जोड प्रकल्प प्रकल्प, मराठवाडा वॉटर ग्रीड आणि कोकणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी याचा योग्य तो वापर यासाठी करण्यास केंद्राकडून मदत हवी त्याचप्रमाणे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ते आज अहमदाबाद येथील गांधीनगर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com